मुंबई

मुंबईतील धारावीत आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह, यातील दोघांचं तबलीकी कनेक्शन

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शुक्रवारी सकाळी मुंबईत सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत आणखीन पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२ वर गेलीये. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्राथमिक माहितीनुसार आजच्या पाच कोविड १९ च्या रुग्णांमध्ये तीन पुरुष तर २ महिला असल्याचं आता समोर येतंय. 

या दोघा महिलांपैकी एका महिलेचं वय २९ वर्ष आहे. सदर महिला ही या आधीच कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्या डॉटरची पत्नी असल्याचं समजतंय. तर दुसरी महिला ३१ वर्षांची असून ही महिला धारावीतील कल्याणवाडी भागात राहणारी आहे. तर आज सापडलेल्या तिन्ही पुरुष धारावीतील ६० फूट रोडवरील मुस्लिम नगर, PMGP कॉलनी आणि मुरुगन चाळीतील आहेत.  

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ट अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यामधील दोघे हे दिल्लीतील निझामुद्दीनच्या मरकज कार्यक्रमातून परातलेल्यांच्या यादीतील होते. या दोघांना आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालंय. या आधीच या दोघांना राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेलं आणि आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  

धारावीतून सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सर्वाधिक रुग हे धारावीतील डॉक्टर बालिगा नगरमधील आहेत. या भागातून ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. यातील एकाचा दुर्दैवी मृत्यू देखील झालाय. त्यामागोमाग धारावीतील मुकुंद नगरमध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह केसेस आढळून आल्यात. 

five more corona positive cases detected at dharavi two of these have delhi markaz connection

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT