मुंबई

Big News : 20 तारखेनंतर कंपन्या सुरु करायच्यात, मग 'हे' नियम पाळा... 

समीर सुर्वे

मुंबई : कोरोनाची बाध कमी असलेल्या ठिकाणी 20 एप्रिल पासून काही उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र, कर्मचार्यांच्या आरोग्य विम्यासह त्यांना द्यायचा सुविधांची यादीच केंद्राने तयार केली आहे.

कर्मचार्यांना काम करण्याच्या ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच बरोबर प्रत्येक कर्मचार्यांचा उष्णांक तपासूनच त्याला कंपनीत प्रवेश द्यावा तसेच प्रवेश दारावर सॅनिटायझरची सोय करावी असे निर्देश केंद्राने दिले आहेत.

कंपन्यांनी कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी सार्वजनिक वाहतूकीवर अवलंबून न राहाता स्वता वाहानांची सोय करावी. तसेच एका वाहानात 30 ते 40 टक्के लोक राहातील याची खबरदारी घ्यावी. तसेच शिफ्ट बदलताना किमान एक तासाचे अंतर ठेवावे असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.

मालकांनी पाच वर्षा खालील मुलं असलेल्या कर्मचार्याला तसेच ज्या कर्मचार्याला ह्रद्यविकार, मधुमेह रक्तदाब तसेच इतर दिर्घाकालीन आजार आहेत अशांना कामावर बोलवू नका. असा सल्लाही केंद्राने दिला आहे.

कामगारानो हे लक्षात ठेवा 

  • गेट वरुन हात सॅनिटाईज करुनच कंपनीत जा.
  • शक्यतो तोंडावरचा मास्क काढू नका 
  • जेवताना एकत्र बसणे टाळावे 
  • एकमेकांमध्ये किमान 5 फुटाचे अंतर ठेवा.

केंद्र सरकारकडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीत बसणारेच उद्योग २० तारखेनंतर सुरु करता येणार आहेत. कोरोना कंटेनमेंट झोनमधील उद्योगांना परवानगी नाही.  

'या' बातम्या वाचणं चुकवू नका : 

follow these guidelines if company owners wishes to start their business after 20th april

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT