मुंबई

ठाणे खड्डेमुक्त करा, नाहीतर चक्का जाम आंदोलन करु, भाजपचा इशारा

राजेश मोरे

मुंबईः ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. तर घोडबंदर रोडवरील उड्डाणपुलांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा बळी गेला आहे. अनेक अपघात झाले आहेत, याकडे लक्ष वेधत भाजपकडून वाघबीळ नाका येथे शनिवारी जनआंदोलन करण्यात आले. ठाणे खड्डेमुक्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास भाजपाकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी दिला.

घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथील उड्डाणपुलावरून जाणाऱ्या ट्रकमधील खोके पडल्यामुळे मोटारीतील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर आणखी पाच अपघात झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोडवरील उड्डाणपुल आणि ठाणे शहरातील खड्ड्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वाघबीळ नाका येथे जनआंदोलन करण्यात आले. आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे गटनेते संजय वाघुले, प्रदेश सचिव संदीप लेले, भाजपाचे घोडबंदर रोड मंडल प्रमुख हेमंत म्हात्रे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकही सहभागी झाले होते. या वेळी खड्ड्यात वृक्षारोपणही करण्यात आले.

शिवसेना सलग 25 वर्षे सत्तेत असूनही ठाण्यातील रस्त्यांवर खड्डे पडलेत. तर एमएमआरडीए, एमएसआरडीसी सारखे विभाग पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असतानाही ठाणे शहर खड्डेमुक्त होऊ शकले नाही, अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली. 

खड्ड्यांमुळे अपघातात नागरिकांचे मृत्यू होत आहेत. टाळूवरील लोणी खाणार्‍या सरकारला आजच्या जनआंदोलनानंतरही जाग न आल्यास, आगामी काळात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निरंजन डावखरे यांनी दिला.

---------------------

(संपादनः पूजा विचारे)

Free pathole Thane pits otherwise we start Chakka Jam agitation BJP warning

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT