तब्बल दोन वर्षांनी अंधेरीच्या गोखले पुलाला मार्ग मोकळा; 112 कोटींचा खर्च येणार
तब्बल दोन वर्षांनी अंधेरीच्या गोखले पुलाला मार्ग मोकळा; 112 कोटींचा खर्च येणार 
मुंबई

तब्बल दोन वर्षांनी अंधेरीतील गोखले पुलाचा मार्ग मोकळा; 112 कोटींचा खर्च येणार

समीर सुर्वे

मुंबई : अंधेरी येथील गोखले पुल बांधण्यासाठी महापालिकेला दोन वर्षांनी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. हा पुल बांधण्याची प्राथमिक प्रक्रिया पुर्ण झाली असून, त्यासाठी 112 कोटी रुपये खर्च येणार आहे. दोन टप्प्यात या पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. 

अंधेरी येथील रेल्वे मार्गावरील गोखले पुल दोन वर्षांपुर्वी कोसळला होता. यात दोघांचा मृत्यू झाला होता. मात्र, अद्याप या पुलाचे बांधकाम सुरु झाले नव्हते. हा पुल रेल्वेच्या हद्दीतून जात असल्याने रेल्वे प्रशासनासह इतर काही प्राधिकरणाच्या परवानग्या मिळवण्याची आवश्‍यकता होती. या परवानग्याची प्रक्रिया महापालिकेने पुर्ण केली असून पुल उभारण्याचे काम करण्यासाठी कागदोपत्री प्रक्रियाही पुर्ण केली आहे. तसेच, पुलापर्यंतच्या पोहच रस्त्याची रुंदीही वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी अडथळा ठरणारी बांधकामे महापालिकेने गेल्या महिन्यात हटवली आहेत. जुलै 2018 मध्ये दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेने या पुलाची तपासणी केली होती. त्यात पुलाच्या पादचारी भागावर भार वाढल्याने ही दुर्घटना घडली होती. तसेच पुलाचे लोखंडी खांब कमकुवत झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र फोर्ट येथील हिमालय पुल दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील पुलांचे ऑडीट केले होते. त्यात या पुलाचे नव्याने बांधकाम करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हे काम करण्यात येत असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

दोन टप्प्यात काम 
गोखले पुलाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. एका बाजूची वाहतुक थांबवून त्या बाजूची बांधकाम करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम करण्यात येईल. या पुलावर रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने अशा पध्दतीने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हिमालय पुल स्टेनलेस स्टिलाचा 
फोर्ट येथील हिमालय पुल स्टेनलेट स्टिलचा बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सुमारे सात कोटी रुपयांपर्यंत खर्चाचा अंदाज असून पुढील आठवड्यात त्यासाठी निवीदा प्रक्रियाही सुरु होणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात हा पुल कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. हा पुल समुद्राच्या परीसरात खाऱ्या हवेमुळे लोखंडाचे पिलर गंजू नये. म्हणून स्टेनलेस स्टीलचा पुल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या पुल दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील सर्व पुलांचे ऑडीट केले होते. त्यानुसार आता पुलांच्या मजबुती करणाचे काम सुरु आहे.

-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT