मुंबई

माथेरानकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे सुरु करणार 'ही' सेवा...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  मुंबईपासून 80 कि.मी. अंतरावर असलेल्या माथेरानमधील 5 हजार रहिवाशांना अत्यावश्यक वस्तू पुरवण्यासाठी मध्य रेल्वेनं (सीआर) आपली पार्सल सेवा पुन्हा सुरू केली आहे. प्रत्येकी 1.5 टन क्षमता असलेल्या टॉय ट्रेनची चाचणी बुधवारी होईल. कोविड- 19चा माथेरानकरांना मोठा फटका बसला आहे. कारण कोविड- 19 मुळे तिथलं टूरिझम पूर्णतः ठप्प झालं आहे. 

माथेरान, एक पर्यावरणीय संवेदनशील विभाग (ईएसझेड) आहे, जिथे लोकं आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी हातगाड्या आणि घोड्यावर अवलंबून असतात.  लॉकडाऊनच्या काळात पारंपारिक मार्गानं आवश्यक वस्तू पोचवण्याच्या किंमतीत अनेक पटींनी वाढ झाली.

लॉकडाऊनच्या काळात येथील हातगाडी चालक आपआपल्या गावी गेल्यानं मुंबई हायकोर्टानं मुंबई हायकोर्टाने मोटारगाडी वाहनांना शहरात आवश्यक वस्तू नेण्याची परवानगी दिली. हायकोर्टाने सप्टेंबरपर्यंत आठवड्यातून तीन टेम्पोला अत्यावश्यक वस्तू नेण्यास परवानगी दिली होती तर सीआरला पार्सल सेवा सुरू करण्यास सांगितले. पार्सल सेवा माथेरानच्या जवळपास 2 किमी अंतरावर असलेल्या अमन लॉज या स्टेशनपासून सुरू करण्यात आली. 22 मे पासून दिवसातून दोनदा ही सेवा करण्यात आली. पण कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे 6 जून रोजी ही सेवा थांबवण्यात आली. 

नेरळ ते माथेरान पर्यंत सीआरची टॉय ट्रेन सेवा सुमारे 21 किमी अंतर व्यापते. नेरळ स्टेशनहून दोन्ही ईएमयू ट्रेन आणि अरुंद गेजवर चालणारी टॉय ट्रेन दोन्हीची पूर्तता करते. ट्रॅकला समांतर जाणारा रस्ता म्हणजे माथेरानच्या आधीचे शेवटचे स्टेशन अमन लॉजपर्यंत जातो. दरम्यान, माथेरानला पुढे जाण्यासाठी अमन लॉज येथून टॉय ट्रेन घेण्याशिवाय इतर कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही. 

सकाळी सकाळी दूध भाजीपाला अशा अत्यावश्यक वस्तूंची गरज असायची मात्र पार्सल गाड्या या दुपारपर्यंत पोहोचायच्या आणि म्हणूनच या सेवेला कमी प्रतिसाद मिळाल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. माथेरान महानगरपालिकेचे माजी अध्यक्ष मनोज खेडकर यांनी म्हटलं की, वस्तू घेऊन येणारा टेम्पो दस्तुरी नाका येथे सामान उतरावयाचा आणि नंतर ते सामान हातगाडी किंवा घोड्यांवरुन अमन लॉज स्थानकापर्यंत घेऊन यायला लागत होते आणि मग ते पुन्हा गाडीत भरायला लागत असे. 

मध्य रेल्वे आता ही सेवा बुधवारीपासून सकाळी सुरू करण्याच्या विचारात आहेत. आम्ही या सेवेला मिळणार्‍या प्रतिसादाकडे लक्ष देऊ आणि त्यानंतर वेळापत्रकाबद्दल निर्णय घेऊ, असं वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT