cm & governor 
मुंबई

अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबत पुन्हा ट्विस्ट; राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली नवी सूचना

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत आज पुन्हा एक नवा ट्विस्ट तयार झाला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेचा विद्यापीठ कायद्यानुसार अंतिम निर्णय घ्या, अशी सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. या परीक्षेसंदर्भात राज्यातील विद्यापीठाच्या कुलपती या नात्याने आपण हे पत्र लिहत असल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थांना मागील वर्षांच्या परीक्षेनुसार सरासरी गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. या पर्यायसह ज्या विद्यार्थांना परीक्षा द्यायची आहे, त्यांना भविष्यात परीक्षेची संधी दिली जाईल, अशी घोषणा केली आहे. या निर्णयाबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हे पत्र लिहले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला हा निर्णय अभूतपूर्व असून कोणताही प्रगल्भ विचार न करता घेतल्याचा त्यांनी या पत्रात म्हटले आहे. जर या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार नसल्याचे वृत्त माध्यमांमध्ये वाचून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसला असून या पत्राच्या उत्तराची आपण वाट बघत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी विद्यापीठांच्या कुलगुरुंची एक समिती गठीत केली होती. या समितीने आपला अहवाल राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे 6 मे 2020 रोजी सुपुर्द केला आहे. हा अहवाल अद्याप आपल्याला प्राप्त झाला नसल्याचे देखील त्यांनी या पत्रात अधोरेखित केले आहे.

तर हा निर्णय अनियंत्रितपणे घेतला असून पदवी मिळविण्याच्या मूलभूत तत्वाचे उल्लंघन करणारा आहे, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले आहे. परीक्षा देणाऱ्यांसाठी दोन वेगवेगळे निकष लागू करता येत नाही. एक परीक्षा देणार आणि एक सरासरी पध्दतीने गुण प्राप्त करणार, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तर परीक्षा देणे हे ऐच्छिक असू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. एकीकडे ते लहान विद्यार्थांची परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर विद्यापीठांनी देखील परीक्षा घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट करत राज्य सरकारला पुन्हा लक्ष्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT