मुंबई : ग्रेट वॉल मोटर्स या चीनच्या सर्वांत मोठ्या एसयूव्ही उत्पादकाने आज आपली हॅवल कन्सेप्ट एच जागतिक स्तरावर सादर केली. यावेळी आपल्या कन्सेप्ट व्हेईकल - व्हिजन25 च्या भारतातील अनावरणाची घोषणा जीडब्ल्यूएमचे उपाध्यक्ष आणि इंडिया ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख यांग वैकी यांच्या उपस्थितीत ऑटो एक्स्पोमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आली. यावेळी इंटेलिजेंट मोबिलिटी रिडिफाइन्ड या संकल्पनेवर भर देताना जीडब्ल्यूएमने इतर मॉडेल्ससोबत हे मॉडेल्सही प्रदर्शनात ठेवलीी होती.
हे ही महत्वाचे...काँग्रेस म्हणतयं आमच ठरलयं
जीडब्ल्यूएम भारतात टप्प्याटप्प्याने 7 हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे नियोजन करत असून त्यात उत्पादन केंद्र, वाहन संशोधन आणि विकास, पॉवर बॅटरीची निर्मिती आणि इलेक्ट्रिक ड्राइव्ह, वाहन आणि साधन उत्पादनांचा समावेश आहे. त्याचवेळी ते टप्प्याटप्प्याने थेट 3 हजार रोजगारनिर्मितीच्याही प्रयत्नात आहेत.
ऑटो एक्स्पो च्या संधीचा फायदा घेऊन जीडब्ल्यूएमने आज आपल्या हॅवल आणि जीडब्ल्यूएम ईव्ही ब्रॅंड्सचे भारतात अनावरण केले. भारतीय ग्राहकांना उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादने देण्याच्या प्रयत्नात जीडब्ल्यूएम आहे. तसेच प्रदूषणमुक्त नूतनक्षम ऊर्जेवर आधारित समाजाच्या स्वप्नातही योगदान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जीडब्ल्यूएम पॅव्हिलियनमध्ये स्मार्ट, इंटेलिजेंट आणि ऑटोनॉमस वाहनांच्या क्षेत्रात त्यांची तांत्रिक झेप दाखवण्यात आली. ऑटोएक्स्पोच्या या आवृत्तीत हे एक मोठे आकर्षण ठरणार आहे. त्यांनी इंटेलिजेंट होम कन्सेप्ट्स दाखवल्या, ज्यातून इंटेलिजेंट कनेक्टेड व्हेइकल्सला जोडलेली गृहोपयोगी साधने, हॅवल एसयूव्हीची इंटेलिजेंट सेफ्टी, नवीन ऊर्जा उत्पादने नियंत्रित करता येतील त्याचबरोबर ऑटो एक्स्पोला भेट देणाऱ्यांच्या सहभागासाठी अनेक संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने बोलताना यांग वैकी (जेम्स यांग) (हरदीप सिंग ब्रार, संचालक (विक्री आणि मार्केटिंग)) म्हणाले की, जीडब्ल्यूएम 'मेक इन इंडिया'च्या राष्ट्रीय धोरणाला प्राधान्याने प्रतिसाद देईल आणि चीन व भारतातील नेत्यांनी सुरूवात केलेले सहकार्याचे धोरण पुढे नेईल. आम्ही भारतात उत्पादन पाया स्थापित करण्याचे आणि इतर देशांनाही उत्पादने निर्यात करण्यासाठी भारताच्या भौगोलिक स्थानाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहोत.
विद्युतीकरण धोरणाची अंमलबजावणी
भारत सरकारने अंमलात आणलेल्या स्वच्छ भारत आणि वाहनांचे विद्युतीकरण यांच्या ध्येयानुसार जीडब्ल्यूएम ग्रेट वॉल ईव्ही हा एक नवीन वीज ब्रॅंड आणण्याच्या प्रयत्नात आहे. जीडब्ल्यूएम भारतात बॅटरी संशोधन आणि विकासात तसेच उत्पादनातही गुंतवणूक करण्याचे नियोजन करत आहे. त्यामुळे भारताच्या विद्युतीकरण धोरणाची अंमलबजावणी होईल आणि त्याला चालना मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.