मुंबई

वादळी पावसाने पॉलीहाऊस, भातशेतीच्या बांधाचे नुकसान; तत्काळ पंचनामे करण्याची मागणी

दिलीप पाटील

वाडा : गत आठवड्यात मुंबईसह पालघर जिल्ह्यात वादळी पावसाने थैमान घातले होते. मुसळधार आणि वादळी पावसाने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यालाही झोडपले होते. यामुळे तालुक्यातील पॉलीहाऊस व भातशेतीच्या बांधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील बहुसंख्य रहिवासी हे शेती करतात. काळानुसार येथील शेतकरीही बदलू लागला आहे. तो आधुनिक पध्दतीने भातशेती व इतरही पिके घेण्याच्या प्रयत्न करीत आहेत. यामध्ये केळी, टरबूज, रंगीबेरंगी ढोबळी मिरची, कलिंगड, आले, बटाटे, कोबी, फ्लॉवर, पपई, ऊस आदी विविध पिके घेण्याचा प्रयत्न येथील शेतकरी गेल्या चार पाच वर्षांपासून करत आहेत. तालुक्यात गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने यात शेतकऱ्यांचे पॉलीहाऊस व भातशेतीच्या बांधाचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील देवघर येथील प्रगतीशील शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी रंगीबेरंगी ढोबली मिरचीचे उत्पादन आधुनिक पध्दतीने घेण्यासाठी पॉलीहाऊसचे शेड उभारले होते. वादळी वाऱ्याने ती कोसळून पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच प्रमाणे देवघर, चिंचघर पाडा येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे बांध वाहून गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे पॉली हाऊसचे शेड, भातशेतीचे बांध वाहून गेले आहेत. त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी.
- भाई पाटील, सदस्य, सेवा सहकारी सोसायटी चिंचघर

---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT