मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून मुंबई पाहिजे तसा पाऊस झाला नव्हता. परंतु आज मुंबईत बहुतांशी भागात 40 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. गेले दोन दिवस पावसाच्या जेमतेम एक सरी बरसत होत्या. पण आज दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती. काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. इतके दिवस मुंबईकर जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. त्यांची आज प्रतिक्षा संपली मुंबईकरांनी आज मनमुराद आनंद घेतला. दिवसभर पाऊस पडत असल्याने वातावरणा गारवा निर्माण झाला.
शहरात रावली कॅम्प 70.59 मिमी, दादर फाय स्टेशन 68.09 मिमी, धारावी फायर स्टेशन 68.82, वरळी फायर स्टेशन 54.59 मिमी पश्चिम उपनगरात मालवणी फायर स्टेशन 48.49 मिमी, वांद्रे फायर स्टेशन 47.75 मिमी. दिंडोशी फायर स्टेशन 42.7 , कांदिवली फायर स्टेशन 40.12 मिमी, पूर्व उपनगरात एम पू्र्व विभाग79.24 मिमी, चेंबूर फायर स्टेशन 77.45 मिमी, एम पश्चिम विभाग 70.09 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गुरूवारी पूर्व उपनगारत सरासराी सर्वाधिक पाऊस झाला. संध्याकळी 6 वाजेपर्यंत शहरात 37.43 मिमी, पश्चिम उपनगर 34.4 मिमी, पूर्व उपनगर 52.6 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली.
मुंबई शहर, उपनगर आणि पूर्वनगरामध्ये सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. ठाण्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसाळल्या. मुंबई व ठाण्यामध्ये दिवसभरात 40 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. गुरुवारी मान्सूनने बहुतांशी भाग व्यापला. येत्या 24 तासात आकाश ढगाळ राहणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्राच्या मुंबईलगतच्या भागांत ढग दाटून आलेत. ढगाच्या वरच्या थरात -80 अंश सेल्सिअस तापमान आहे. वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून वाहते आहे. वायव्य, उत्तर वायव्य या पट्टीत वरच्या थरात वारे वाहत आहेत. या स्थितीमुळे रात्रभर पाऊस सुरू राहील. काही भागांत पावसाचा जोर जास्त असेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिली. संध्याकाळच्या साडेपाच्या नोंदीनुसार कुलाबा येथे 26.3 मिमी तर सांताक्रुझ येथे 36.6 मिमी पाऊस पडला. कुलाबा येथे कमाल 30.8 तर सांताक्रुझ येथे 32 3 अंश सेल्यियस तापमान होते.
मेघवाडीत चाळीचा भाग कोसळला; तीन जखमी
पावसामुळे दुपारी 12 वाजाता जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी येथे रिकाम्या असलेल्या चाळीचा काही भाग बाहेरच्या बाजूस कोसळून यामध्ये तीन लोक किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून घरी पाठवण्यास आले, तसेच कुर्ला येथील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. मदत कार्य रवाना करण्यात आले, अशी माहिती अग्निशमन दल नियंत्रणा कक्षाकडून देण्यात आली. शहरात पाच, पूर्व उपनगरात 5 व पश्चिम उपनगरात 8 एकूण 18 झाडे व फांद्या पडण्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्वरित झाडे व फांद्या तोंडण्याचे व उचलण्याचे काम सुरू करण्यात आले. शहरात 1 , पूर्व उपगनरात 3 व पश्चिम उपनगरात 1 अशा एकूण पाच ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या असून त्यामध्ये कुणीही जखमी नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेद्वारे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.