मुंबई

रक्तरंजित प्रेम ! आधी प्रेयसीवर झाडली गोळी, नंतर स्वतःला गोळी मारून प्रियकराची आत्महत्या

राजू परुळेकर

मुंबई (अंधेरी) : मालाड येथे राहणार्‍या निधी मिश्रा या 22 वर्षांच्या प्रेयसीवर गावठी कट्ट्याने गोळी झाडल्यानंतर राहुल यादव या प्रियकराने रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री मालाड परिसरात घडली. या गोळीबारात दोघांचाही मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

मालाडच्या इनॉरबीट मॉलजवळच रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. राहुल आणि निधी हे दोघेही एका खाजगी कंपनीत कामाला होते, निधी ही मालाड तर राहुल हा कांदिवली परिसरात राहत होता. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते, मात्र ते दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्याने त्यांचा प्रेमाला आणि लग्नाला घरच्या लोकांचा विरोध होता. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना खूप समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. या प्रेमप्रकरणामुळे निधीच्या कुटुंबियांनी तिचे लग्न ठरविले होते. इतकेच नव्हे तर तिचा साखरपुडा देखील केला होता. ही माहिती राहुलला समजताच त्याने निधीला मालाड येथे भेटण्यासाठी बोलाविले होते, सोमवारी रात्री ते दोघेही इनॉरबीटजवळील एका मैदानात भेटले. यावेळी त्यांनी काही वेळ संभाषण केले. मात्र लग्नाला घरच्यांचा विरोध पाहता, या दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता. 

राहुल हा त्याच्यासोबत गावठी कट्टा घेऊनच आला होता, रात्री नऊ वाजता त्याने याच कट्ट्याने निधीवर गोळी झाडली आणि नंतर स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. अचानक झालेल्या गोळीबारानंतर तिथे उपस्थित लोकांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. या माहितीनंतर बांगूरनगर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तसेच गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तिथे धाव घेतली होती. 

रक्तबंबाळ झालेल्या या दोघांनाही तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दोघांची ओळख पटली असून ही माहिती त्यांच्या पालकांना कळविण्यात आलीद आहे. प्राथमिक तपासात राहुलने निधीवर गोळी झाडून नंतर स्वतवर गोळी झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा हत्येसह आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, राहुलकडे गावठी कट्टा कुठून आला आला याचा आता पोलिस तपास करीत आहेत.  घटनास्थळाहून पोलिसांनी गावठी कट्टा, रिकाम्या पुंगळ्या आणि जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले, रात्री उशिरापर्यंत दोघांच्या नातेवाईकांची पोलिसांकडून जबानी घेण्याचे काम सुरु होते. 

( संपादन - सुमित बागुल )

horrible incident in malad boyfriend shot his girlfriend and then shot himself

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT