hospital bill 
मुंबई

बाप रे ! कोरोना रुग्णाच्या हातात थोपवलं तब्बल 'इतक्या' लाखांचं बिल; रक्कम बघून तुम्हालाही बसेल धक्का.. 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोनाबाधित रुग्णाच्या हातात चक्क सव्वा लाखांचं बिल थोपल्याची घटना मुंबईत घडली आहे. एकीकडे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला १०० टक्के मोफत आरोग्य सुविधा देण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनीच यासंदर्भातली घोषणा केली आहे. तरी सुद्धा ट्रस्ट असलेल्या रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णाला तब्बल लाखो रुपयांचं बिल भरावं लागलं आहे. धक्कादायक म्हणजे हा रुग्ण केशरी कार्डधारक आहे. 

विशेष म्हणजे या आरोग्यदायी योजनेचा हा रुग्ण लाभार्थी आहे. तरी त्याला इतक्या लाखांचं बिल भरावं लागलं. योजनेचा लाभार्थी असून इतकं बिल का असा प्रश्न उपस्थित केला असून त्याला कोणाताही प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. 

तब्बल १ लाख ३६ हजार रुपयांचं बिल:

७ मे रोजी लुंबानीबाग येथे राहणारे ३९ वर्षीय व्यक्ती यांना के.जे. सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. हे रुग्ण केशरी कार्डधारक आहेत. हे रुग्णालय ट्रस्ट रुग्णालय आहे. तसंच या रुग्णालयामध्ये ते आरोग्यसेवक असल्यामुळे आरोग्य योजनेचा लाभ मिळेल असा त्यांना वाटलं होतं.

मात्र डिस्चार्जच्या वेळी या कोरोनाबाधित रुग्णाच्या हातात रुग्णालय प्रशासनानं १ लाख ३६ हजार रुपयांचं बिल दिलं गेलं. याआधीच त्यांच्याकडून ७० हजार रुपयांच्या अमानत रक्मक घेतली होती. तर कोरोनाची टेस्ट करण्यासाठी खासगी लॅबमध्ये साडेचार हजार रुपये आधीच भरण्यात आले होते. 

या सर्व प्रकारानंतर म. फुले जनआरोग्य योजनेचे प्रमुख डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे कोरोनाबाधित रुग्णानं विचारणा केली. त्यावर शिंदे यांनी इतर काही ट्रस्ट रुग्णालयांचा संदर्भ देत हे उपचार योजनेमध्ये ठरलेल्या नियमांनुसार देण्यात येतात, असं सांगितलं. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. 

मुंबईसह पुण्यात ज्या मोठ्या रुग्णालयांचं जिप्सा ( जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएसन) सोबत विमा करार करण्यात आले आहे, अशा रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना विमा योजनेअंतर्गतच जे काही दर निश्चित करण्यात आलेत.

त्याचप्रमाणे देयकांची आकारणी करायची असून रुग्ण कोणत्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये दाखल झाला असेल तरी सुद्धा त्याच्याकडून विमा रकमेपेक्षा अधिकच्या रकमेची मागणी करता येणार नाही आहे. या योजनेत सर्व सहभागी खासगी रुग्णलयांना हा निर्णय बंधनकारक असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

hospitral gave bill of some lacs rupees to corona patient read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT