मुंबई

सोसायट्यांमध्ये कॅरम, बुद्धिबळ खेळताय? तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल....

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईत कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. मात्र, तरीसुद्धा संकट पूर्णपणे टळलेले नाही. मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी करून नये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, अशा मार्गदर्शक सूचना प्रशासनाकडून नागरिकांना दिल्या आहे. त्याशिवाय लॉकडाऊनमुळे अनेकजण बाहेर जात नसल्याने अनेक जण सोसायटींमध्ये एकत्र येत वेळ घालवत असल्याचे दिसून आले. मात्र, त्याठिकाणी जास्त गर्दी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण  इमारतीच्या खाली,  सोसायट्यांमध्ये, वस्त्यांमध्ये बुद्धीबळ, कॅरम तसेच इतर खेळ खेळण्यासाठी एकत्र जमत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकाठिकाणी जमून कोणत्याही प्रकारचे खेळ खेळण्यास एकत्र येऊ नये, अशी सक्त ताकिदत महानगर पालिकेने दिले आहे. त्यानंतरही अशा प्रकारे विनाकारण रहिवाशी एकत्र येत असतील तर त्यांच्यावर साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस महापालिकेने विक्रोळी येथील सोसायट्यांना पाठवली आहे. पालिकेने अशी कारवाई केल्यास 1 वर्षापर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.

झोपडपट्ट्यांमधील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आता मुंबईतील इमारतींमध्ये कोव्हिडचे रुग्ण वाढू लागले आहे. रहिवाशांच्या सुविधेसाठी महानगर पालिका आता संपूर्ण इमारत सील करत नसून रुग्ण आढळलेला मजला किंवा विंग सील करत आहे. मात्र, काही इमारतींमध्ये रहिवासी विनाकारण एकत्र येत आहे. त्यामुळे कोव्हिडचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने आता रुग्ण आढळलेल्या इमारतीमधील रहिवाशांना विनाकारण एकत्र येण्यास बंदी केली आहे.

महापालिकेच्या एस प्रभाग कार्यालयामार्फत विक्रोळी कन्नमवार नगर येथील काही सोसायट्यांना याबाबत नोटीस पाठवली आहे. "इमारतींमध्ये रहिवाशी एकत्र येऊन कॅरम, बुद्धिबळ असे खेळ खेळत आहे. हे खेळ खेळताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्‍य नाही. त्यामुळे रुग्ण वाढण्याची शक्‍यता नकारता येत नाही. त्यामुळे कोणीही खेळण्यासाठी एकत्र येऊ नये. अन्यथा साथ नियंत्रण कायदा 1897 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमध्येही गुटख्याची तस्करी जोरात; ठाण्यात पुन्हा एकदा लाखोंचा मुद्देमाल जप्त....

5 हजार इमारती सील
कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबईतील 5 हजार 519 इमारती सील करण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये तब्बल 8 लाख 98 हजार नागरिक राहात असून 24 हजार घरे आहेत. तर, 21 हजार 746 रुग्णांची नोंद झाली आहे. दादर, माहिम, धारावी जी उत्तर परिसरातील इमारतींमध्ये 1939 रुग्ण आहेत. एफ दक्षिण लालबाग परळ या भागातील इमारतींमध्ये 1924 आणि ग्रॅन्टरोड,मलबार हिल डी प्रभागातील इमारतींमध्ये 1812 रुग्ण आहेत.
----
संपादन :  ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT