मुंबई

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, कोरोनामुळे केशकर्तनालय व्यवसाय बुडाला 

सुजित गायकवाड

नवी मुंबई : कोरोनाच्या धर्तीवर सुरू असलेल्या टाळेबंदीने केशकर्तनालयासारख्या तेजी असणाऱ्या व्यवसायाचा जीव घेतला आहे. चार महिन्यानंतर जुलै महिन्यापासून केशकर्तनालयाची दूकाने खुली झाली खरी. मात्र दूकाने खुली करण्यासाठी दिलेल्या अटींनुसार वाढलेला खर्च व घटलेला ग्राहक यामुळे केशकर्तनालय दूकानदारांचे कंबरडे मोडले आहे. दोन महिन्यानंतरही व्यवसायात 50 टक्क्यांहून जास्त उत्पन्नात घट आली आहे.  

कोरोनामुळे टाळेबंदी सुरू असल्याने गेले मार्च महिन्यांपासून जून पाच महिने दूकाने बंद होती. त्यामुळे केशकर्तनालयाचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला. नाभिक समाजाच्या मागणीस्तव 28 जूनला सरकारने सलूनची दूकाने उघडण्यास परवानगी दिली. मात्र ऑड-इव्हन नुसार दुकाने सुरू करण्याची परवानगी दिल्याने एक दिवासाआड दूकाने खुली ठेवण्यात येत होती. सवडीनुसार केस कापायला यायची सवय असल्यामुळे व्यावसायात सुर गवसला नाही.

सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दूकाने खुली ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे ग्राहकांमध्ये घट आली. केशकर्तनालय व्यवसाय हा संपूर्णपणे कुशल कारागीरांवर अवलंबून आहेत. सद्या सर्व कारागिर गावाला गेले आहेत. ते परतलेच नाही. पावसाळा असल्यामुळे ग्राहक घराबाहेर पडायला मागे-पुढे पाहतात. बहुतांश लोक कोरोनाच्या भितीमुळे घरातच गरजेनुसार केस कापायला लागले आहेत. त्यामुळे केस कापायला येणाऱ्यांचा तोही आकडा कमी झाला आहे. आता नियमित दूकाने खुली ठेवण्याची परवानगी दिली असली तर ग्राहकांच्या मनातील भिती कमी न झाल्यामुळे धंद्यात तेजी आलेली नाही.

जे येत आहेत ते फोनवरून आधीच वेळ निश्चित करून येत आहेत. दर आधीच वाढवलेले असल्यामुळे आणखिन जास्त दर वाढवण्याच्या माणसिकतेत नाभिक समाज नाही. मात्र युनिसेक्स नावावर चालवण्यात येणारे हायफाय दूकानांमध्ये ग्राहकांवर ज्यादा खर्च केला जात आहे. पारंपारीक पद्धतीने सलूनचा व्यवसाय करणाऱ्या दूकानदाराकडे भांडवल नसल्याने ते दूकानदार एवढ्या आलिशान पद्धतीने दूकान चालवू शकत नाही. कोरोनामुळे उत्पन्नात घट आल्याने दूकानदारांना कारागिरांचे पगार, दूकानातील खर्च, गाळ्याचे भाडे देताना नाकी नऊ होत आहे.

कोरोनामुळे नव्या नियमांनुसार केशकर्तनालय व्यवसायात अनेक बदल आले आहेत. हे बदल खूप महागडे असल्याने ज्या वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत त्या वस्तू सरकारने माफक दरात उपलब्ध कराव्यात. वाढलेला अतिरीक्त खर्च भरून काढण्यासाठी आणखिन दर वाढवण्याबाबत संघटनेचा विचार नाही.

- नरेश गायकर, नाभिक विकास फाऊंडेशन, अध्यक्ष

नाभिक विकास फाऊंडेशनतर्फे दूकानदारांना जगवण्याचे काम केले जात आहे. ज्याचे स्वतःचा गाळा आहे त्याला दूकानातील साहित्यांचा खर्च, कारागिरांचा पगार, स्वच्छतेवरील खर्च निघणे कठिण होत आहे. तर ज्यांचे गाळे भाड्याने आहे. त्यांना भाडे देणेही मुश्किल ठरत आहे. पूर्वी ज्याला दिड लाख रूपये उत्पन्न महिन्याला मिळत होते. आता त्याला महिन्याला 20 हजार देखील उत्पन्न मिळत नाही. ही घट भरून काढण्यासाठी दर वाढवण्याचे काही जणांच्या विचाराधिन आहे. परंतू दर वाढ केल्यास येणारे ग्राहक देखील न येण्याची भिती नाभिक समाजाच्या संघटनांना सतावत आहे. नवी मुंबई  शहाबाज, शिरवणे आणि घणसोली या गावांमध्ये नाभिक समाजाचे लोक वास्तव्यास आहेत. शहरात एकूण सात हजार केशकर्तनालायची दूकाने आहेत. या सर्व दूकानदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहीले आहे.

नव्या नियमांमुळे खर्च वाढला

नव्या नियमांमुळे आता मास्क, हॅण्डग्लोव्ज, ऍप्रोन, सॅनिटाईज तसेच डिस्पोजल रेजर्स एवढे साहित्य खरेदी करावे लागत आहे. या खरेदीमुळे आता एका दाढी अथवा केस कापण्यामागे 50 ते 70 रूपये अतिरीक्त खर्च येत आहे. त्यामुळे केशकर्तनालय व्यवसायिकांनी दरवाढ केली आहे. 50 रूपयांत पूर्वी दाढी करता येत होती आता दाढी करण्याचे 100 रूपये तर केस कापण्याचे 100 च्या ऐवजी आता 150 रूपये घ्यायला लागले आहेत.   

( संपादन - सुमित बागुल )

income is lower than expenses hair cutting salons are facing tremendous problem amid corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT