मुंबई

गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ, जूनच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात 155 टक्क्यांनी वाढ

भाग्यश्री भुवड

मुंबई: देशभरात आता हळूहळू अनलॉक होत असताना जून महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर मध्ये गॅस्ट्रोएन्टेरिटिसच्या रुग्णांमध्ये 155% वाढ झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर विक्रेते उपलब्ध नसल्याने लोकांना घरगुती अन्न खाण्याची सवय झाली होती. यामुळे गॅस्ट्रोच्या महिन्याच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र अनलॉक झाल्यानंतर रस्त्यावरील अनेक व्यवसाय सुरु झाले. त्यात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचा ही समावेश होता. त्यामुळे, लोकांमध्ये हळूहळू पोटाच्या विकारांमध्ये प्रकरणे वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गॅस्ट्रोएन्टेरिटिस हा पोटाच्या विकाराचा एक प्रकार आहे. जो सामान्यत: एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात किंवा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतो. यामुळे अतिसार, पोटात पेटके, मळमळ, उलट्या आणि ताप येतो.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये गॅस्ट्रोएन्टेरिटिसचे 40 रुग्ण आढळले होते. ते ऑक्टोबरमध्ये 102 पर्यंत वाढले आहेत. रस्त्याच्या बाजूला सुरु केलेल्या खाण्यापिण्याचे स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्स उघडल्याने या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. 

बॉम्बे हॉस्पिटलचे सल्लागार जनरल फिजीशियन डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, लॉकडाऊननंतर आता अनेक स्ट्रीट फूड स्टॉल्स उघडलेत. लोकांनी आता घरगुती अन्न खाणे बंद केले आहे. त्यानंतर या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना अजूनही आपल्या जीवनाचा एक भाग असल्याने बाहेर खाताना नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोविड -19 प्रकरणांमध्ये घट होईपर्यंत मुंबईकरांनी बाहेर खाणे टाळावे. हे केवळ गॅस्ट्रो रोखण्यास मदत करणार नाही तर कोविड -19 च्या संसर्गापासून ही रोखू शकतो.

पालिकेच्या आकडेवारीतून असेही समोर आले आहे की, गेल्या महिन्यात लेप्टोस्पायरोसिसचे 63 रुग्ण आढळले होते. जे 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात केवळ 30 होते. एफएन (माटुंगा), जीएस (एल्फिन्स्टन), जीएन (दादर), पीएस (गोरेगाव) आणि पीएन वॉर्ड (मालाड) या पाच प्रभागांत सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. 

पालिकेने दिलेल्या सल्ल्यानुसार, साचलेल्या पावसाच्या पाण्यातून जास्त वेळ चाललेल्या व्यक्तींनी 72 तासांच्या आत उपचार करुन घ्यावेत. तसंच, खासगी हॉस्पिटलमध्येही तापाच्या रुग्णांना डॉक्सिसायक्लिन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल त्यांनी आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्व खासगी चिकित्सकांना पावसाळ्याच्या हंगामात सर्व तापाच्या रूग्णांना डॉक्सीसायक्लिन सुरू करण्याची विनंती केली आहे. डॉक्सिसायक्लिनसह केलेले उपचार अवयवांमधील इतर गुंतागुंत प्रतिबंधित करते.   हे लेप्टोस्पायरोसिसमुळे होणार्या मृत्यूचा दर कमी करण्यास सोपे करेल असे महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

----------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Increase in gastroenteritis patients 155 percent increase October compared June

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT