मुंबई

P305 बार्ज समुद्रतळाशी सापडला; 20 जण अद्यापही बेपत्ता

विराज भागवत

नौदलाच्या मकर आणि तरस या विशेष शोधनौकांनी केली समुद्रतळाची पाहणी

मुंबई: चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात हिरा तेल उत्खनन फलटांच्या परिसरात बुडालेल्या बार्ज P305 चे अवशेष समुद्रतळाशी सापडले. शनिवारी संध्याकाळी नौदलाच्या मकर आणि इतर पाणबुड्यांनी या अवशेषांचा शोध घेतला. हा बार्ज शोधण्यासाठी नौदलाच्या मकर आणि तरस या विशेष शोधनौकांनी अत्याधुनिक सोनार यंत्रणेसह समुद्रतळाची पाहणी सुरू केली होती. शनिवारी संध्याकाळनंतर त्यांना हा बार्ज समुद्रतळाशी बुडालेल्या अवस्थेत सापडला. याच वादळात बुडालेली टगबोट वरप्रदा हिच्या अवशेषांचा शोध अजूनही समुद्रतळाशी सुरू असून अद्याप २० जण बेपत्ता आहेत. (INS Makar finds sunken remains of barge P305 20 men still missing)

चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात P305 बार्ज बुडून झालेल्या दुर्घटनेतील ५१ मृतदेह आतापर्यंत सापडले असून अद्याप २४ जण बेपत्ता आहेत. तर अ‍ॅफकॉन कन्स्ट्रक्शन्सकडूनही मृतांच्या नातलगांना ३५ ते ७५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली. दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे काम अद्यापही नौदल व तटरक्षक दलातर्फे सुरू आहे. नौदलाची टेहळणी विमाने अत्याधुनिक उपकरणांमार्फत तर हेलिकॉप्टर कमी उंचीवरून उड्डाण करून भरसमुद्रात शोध घेत आहेत. त्याखेरीज नौदलाच्या युद्धनौका व स्पीडबोट देखील समुद्रात शोध घेत आहेत. ५१ पैकी ४९ मृतदेह नौदलाकडून मुंबईत आणले गेले.

'या' कारणामुळे अरबी समुद्रात बुडाला P305 बार्ज

वादळात सर्व बार्ज व रीग सुरक्षित जागी नेण्याचे प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून सुरू होते. मात्र चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे P305 बार्जचे सर्व नांगर तुटून तो भरकटला आणि एका निर्मनुष्य तेलउत्खनन फलाटावर आदळला. त्यामुळे त्याच्यात पाणी भरून नंतर तो बुडाला, अशी माहिती ONGC तर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

BJP MLA Sanjay Upadhyay Threat : बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना पत्राद्वारे मिळाली जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

SCROLL FOR NEXT