कॉंग्रेस, शिवसेनेत अंतर्गत कलह; बंडखोरीची शक्‍यता 
मुंबई

कॉंग्रेस, शिवसेनेत अंतर्गत कलह; बंडखोरीची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत मविआची मोट करून उतरू पाहणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. ज्या पक्षाचा स्थानिक नगरसेवक असेल, त्याच पक्षाचा उमेदवार त्या प्रभागातून लढेल, दुसऱ्या पक्षाने ती जागा न मागण्याचा अलिखित नियम मविआमध्ये झाला आहे. या अलिखित नियमामुळे कॉंग्रेस व शिवसेना या पक्षांतील मुख्य नेत्यांच्या जागांवर गंडांतर निर्माण झाले आहे. त्यामुळे स्वतःसाठी जागा घेऊन कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्याच्या शक्‍यतेने कॉंग्रेस व शिवसेनेत अंतर्गत कलहात वाढ झाली आहे. 

राज्यातील यशस्वी खेळीनंतर आता महापालिकेतही मविआतर्फे नशीब आजमावले जाणार आहे. राज्याप्रमाणेच महापालिकेतही मविआच्या समिकरणाला यश येईल, असे वातावरण सध्या नवी मुंबईतील नेत्यांकडून तयार केले जात आहे. हे पाहता मविआतील मित्रपक्षांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याची योग्य वेळ आली आहे; मात्र पक्षीय बलाबलानुसार ज्या प्रभागात स्थानिक नगरसेवक असेल, त्या पक्षालाच ती जागा मिळणार असल्याचा नियम मविआच्या मित्रपक्षांकडून बनवण्यात आला आहे. या नियमामुळे कॉंग्रेसमध्ये सर्वांत मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

कॉंग्रेसमधील स्थानिक नेते स्वतःला, स्वतःच्या मुलाला, स्वतःच्या पत्नीला उमेदवारीचे तिकीट पदरात पाडून घेण्याच्या तयारीला लागले आहेत. 15 फेब्रुवारीपासून मविआमध्ये प्रत्यक्ष जागावाटपावरील वाटाघाटींना सुरुवात होणार आहे. या वाटाघाटींमध्ये घरात उमेदवारीचे तिकीट आणताना नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांचा बळी दिला जाणार असल्याच्या दाट शक्‍यतेने कॉंग्रेसप्रमाणे शिवसेनेमध्येदेखील अंतर्गत कलह वाढला आहे. ऐरोली, घणसोली, वाशी, नेरूळमधील शिवसेनेच्या जागांवर कॉंग्रेसकडून मागणी केली जाणार आहे; तर शिवसेनेतर्फेही कॉंग्रेसच्या काही जागा मागितल्या जाणार आहेत, परंतु जागावाटपाच्या शह-काटशहामध्ये प्रामाणिक पदाधिकाऱ्यांनी केलेले बलिदान वाया जाऊ नये अशी भावना पदाधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. 

भाजपचे नाराजांवर लक्ष 
आमदार गणेश नाईक यांना पालिकेतील सत्तेतून पायउतार करण्यासाठी मविआकडून नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणासोबत विविध खेळी खेळल्या जात आहेत, परंतु भाजपतर्फेही मविआच्या नाराजांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. मविआमध्ये तिकीट न मिळणाऱ्यांना तत्काळ भाजपतर्फे उमेदवारी देण्याची शक्‍यता आहे. भाजपतर्फे काही नाराजांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. 

घरवापसीवर राष्ट्रवादीची मदार  
महापालिका निवडणुकीत मविआच्या निमित्ताने एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सद्यपरिस्थितीत ऐरोली व बेलापूर मतदारसंघात जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी उमेदवारांची वानवा आहे. नेरूळमधील दोन नगरसेवक सोडल्यास सध्या राष्ट्रवादीकडे नगरसेवकांची कुमक कमी आहे. आमदार गणेश नाईकांसोबत भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक पुन्हा माघारी परतल्यास राष्ट्रवादीला गेलेले अच्छे दिन येण्याची शक्‍यता आहे. नाईकांसोबत भाजपमध्ये गेलेले सीवूड्‌समधील नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP विरोधात, अमित शाहांविरोधात घोषणा दिल्या... पोलिसांची तडीपारीची कारवाई; मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? पोलिसांना फटकारले

'होय, मी लग्न करतोय' मुलासमोर तिसऱ्या लग्नाची घोषणा केल्यानं आमिर खान ट्रोल, नेटकरी म्हणाले...'यांच्याकडे सूनाऐवजी सासू...'

Pune Rain Alert : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना

Latest Marathi News Live Update : शिंगणापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त, धोकादायक वाहतुकीला प्रशासनाचा अटकाव

Cristiano Ronaldo निवृत्त होतोय? बहिणीच्या दाव्याने खळबळ, पोर्तुगालच्या सुपरस्टारनेही त्यावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, मी आता...

SCROLL FOR NEXT