kalyan corona 
मुंबई

चिंताजनक! अनलॉकनंतर 'या' शहरात पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका

रविंद्र खरात

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या स्थिरावली होती. मात्र शहरातील सरसकट दुकाने सुरू असताना मागील तीन चार दिवसापासून तीनशे हून अधिक कोरोना बाधित रुग्णाची संख्या प्रतिदिन आढळून येत असून सर्वात जास्त डोंबिवली पूर्वेला रुग्णाची संख्या आढळून आली आहे .

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. जुलै महिन्यात 400 हुन अधिक कोरोना बाधित रुग्ण प्रतिदिन नव्याने आढळून येत होते ही संख्या स्थिरावली होती. मात्र ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवली शहरात सरसकट दुकाने सुरू होताच कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे .

23 ऑगस्ट 2020 पर्यँत एकूण कोरोना बाधित रुग्णाची संख्या 26 हजार 623 रुग्ण झाले आहेत. यात यात 3 हजार 184 रुग्ण उपचार घेत असून 22 हजार 883 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले असून उपचार दरम्यान 556 जणांचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णाची विगतवारी केली असता डोंबिवली पूर्वेला सर्वात जास्त 7 हजार 607 रुग्ण असून तद्नंतर कल्याण पश्चिमेला 7 हजार 242 रुग्ण होते तर तद्नंतर कल्याण पूर्वेला 5 हजार 552 रुग्ण आणि डोंबिवली पश्चिमेला 4 हजार 189 रुग्ण आढळून आले. मोहना 1 हजार 16 तर मांडा टिटवाळा मध्ये 916 रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात कमी पिसवली परिसरात131 रुग्ण आढळून आले आहेत .गणेशोत्सव आणि सरसकट दुकाने सुरू झाल्याने नागरिकांची सर्वच ठिकाणी गर्दी दिसून येत असून दुसरी कडे झपाट्याने रुग्णाची संख्या वाढत असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनी नियमांचे पालन, मास्क लावावे, सुरक्षित अंतर ठेवावे, आणि अँटीटेस्ट करणे ही गरजेचे असून या गणेशोत्सवामध्ये नागरिक किती नियमांचे पालन करतात आणि वाढलेली रुग्णाची संख्या रोखण्यासाठी पालिका किती उपाययोजना करण्यास यशस्वी ठरते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

(संपादन : वैभव गाटे)

in kalyan dombivali corona positive patient rate is increased

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Putin-Modi Meet: क्रीडा आणि आरोग्यासह अनेक करार... पुतिन आणि मोदींच्या लक्षवेधी प्रतिक्रिया; भेटीत नेमकं काय घडलं? वाचा A टू Z अहवाल

लंडनच्या चौकात दिसणार राज आणि सिमरन! पुतळा अनावरणावेळी भावुक होत किंग खान म्हणाला...'कुणालाच कल्पना नव्हती की'

Kolhapur Plastic Ban : प्लास्टिक बंदी उल्लंघन करणाऱ्यांवर आता दंडासह तीन महिन्यांचा कारावास होणार; महापालिका विशेष मोहिमेस सज्ज

India's Probable Playing XI : रवींद्र जडेजाला डच्चू, भारताच्या अंतिम ११ मध्ये आशिया चषक स्पर्धेतील हिरो परतणार? जाणून घ्या बदल

Fact Check: इंडिगो विमानाजवळ बॅगा टाकून बसलेल्या प्रवाशांचा 'तो' फोटो नेमका कधीचा? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT