मुंबई - 35 वर्षे सेवा दिल्यानंतरही कामा रुग्णालय प्रशासनाने सर्व्हंट मावशीला कोरोनाच्या उपचारांसाठी दाखल करुन घेतलं नसल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी कामा रुग्णालयातील एका सर्व्हंट मावशीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली. गेले 35 वर्ष या मावशी कामा रुग्णालयात कार्यरत होत्या. दरम्यान, त्यांच्या मुलीला ही कोरोनाची लागण झाली होती. तिचा ही कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.
कामा रुग्णालयातील दोन परिचारका ही कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. यापैकी एक परिचारीका सेंट जॉर्ज आणि एक जीटी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर, एकूण 9 कर्मचारी कोरोना संशयित आहेत.
35 वर्षे कामा रुग्णालयात काम करणार्या 53 वर्षीय मावशी कुर्ला पश्चिम येथील साईबाबा मंदिर येथे राहायला होत्या. 4 फेब्रुवारी पर्यंत त्यांनी कामा रुग्णालयात आपली सेवा बजावली मात्र त्यानंतर त्या घरीच राहिल्या. 30 एप्रिलला या मावशी आणि त्यांच्या मुलाला ताप, खोकला अशी लक्षणे जाणवू लागली. फॅमिली डॉक्टरकडून उपचार घेतले पण त्यांना बरं वाटत नव्हतं त्यामूळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
त्यामूळे, मावशीची मोठी मुलगी त्यांना कामा रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन गेली. पण, जेजे मधून चाचणी करुन घ्या असं कामा रुग्णालयातून सांगण्यात आले. मात्र, त्यांनी जवळच्या जीटी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. जीटी मध्येही त्यांना आधी दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला होता. मात्र नंतर मावशीची प्रकृती आणखी खालावली. त्यामूळे, त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. उपचारा दरम्यान या मावशीचा 5 मे या दिवशी जीटी रुग्णालयातच मृत्यू झाला.
5 मे याच दिवशी त्यांच्या 36 वर्षांच्या मुलीची ही प्रकृती गंभीर झाली. 6 तारखेला पहाटे 4.30 च्या दरम्यान त्यांना कूर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काल म्हणजेच 7 मे या दिवशी तिचा ही मृत्यू झाला.
धुळ्याहून आली अन् लॉकडाऊन मध्ये अडकली आणि मृत्यू झाला-
या मावशिंची मुलगी धुळ्याहून मुंबईत आली होती. दुसर्या बहिणीला 8 फेब्रुवारी या दिवशी झालेले बाळ बघायला म्हणुन तिच्या 15 वर्षांच्या मुलीसोबत मुंबईत आली आणि लॉकडाऊन अडकली. तिचे पती आणि 16 वर्षीय मुलगा धुळ्यातच आहेत. एकाच कुटुंबातील दोघांनी कोरोनामुळे जीव गमावल्याने कुटुंबातील सदस्यांवर दुखाचा डोंगर कोसळला असुन या कुटुंबाला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याची माहीती कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या दोघींचा ही कोरोना अहवाल कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आलेला नाही. मात्र, दोघांचे ही मृतदेह हे प्लास्टिक मध्ये रॅप करुन रुग्णालयातून थेट चेंबूर स्मशानभूमित नेल्याची माहिती ही नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराविषयी कामा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. तुषार पालवे यांनी कोणत्याही ड्यूटीवर असणार्या कर्मचार्याचा मृत्यू झालेला नाही असं स्पष्ट केले आहे.
एकत्र बसमधून प्रवास ठरू शकतो जीवघेणा -
कामा रुग्णालयातील अनेक परिचारिका आणि कर्मचारी रुग्णालयीन सेवा देण्यासाठी त्यांच्या साठी देण्यात आलेल्या बस मधून प्रवास करत आहेत. त्यामुळे, कोणत्याही प्रकारचे सोशल डीस्टस्टींग बसमध्ये पाळणे कठिण होत आहे. शिवाय, जंतुसंसर्ग पसरू शकतो. त्यामूळे, रेल्वे अधिकार्यांसारखी अत्यावश्यक सेवेत येणार्या कर्मचार्यांसाठी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी कामा रुग्णालयाच्या अधिक्षकांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
kama hospital refused to admit their own health servant loses life reda full news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.