Kedar Dighe Latest News Kedar Dighe Latest News
मुंबई

Shivsena : ठाण्यात शिंदे विरुद्ध दिघे; उद्धव ठाकरेंची मोठी खेळी

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : बंड केल्यापासून एकनाथ शिंदे हे सतत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेत आहे. आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचे सांगत आहे. मी मुलाखत देईल तर भूकंप येईल. आनंद दिंघे यांच्यासोबत काय घडले हेही सांगेल, असेही ते म्हणाले होते. अशात ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी खेळली आहे. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न यातून केला आहे.

माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील (Thane District) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे. रविवारी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या.

शिवसेनेने (Shiv sena) आनंद दिघे यांच्या सहकारी असलेल्या अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या नियुक्तीनंतर ठाण्यात पुन्हा दिघे राज सुरू होईल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहरप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक केली आहे.

शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न

केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करून उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ देत एकनाथ शिंदेवर जोरदारटीका केली आहे. आनंद दिघे यांची सर्वाधिक प्रतारणा तुम्हीच केल्याचा आरोप केला होता.

जुन्हा शिवसैनिकांना संधी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केदार दिघे यांना बाजूला केले होते. एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांचे पक्षात पंख छाटले होते. तेव्हापासून केदार दिघे एकनाथ शिदे यांच्यावर नाराज होते. आता त्यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. शिवसेना नेतृत्वाकडून जुन्हा शिवसैनिकांना संधी दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT