राज्यात 'केरळ पॅटर्न'? राजेश टोपे यांची केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा
राज्यात 'केरळ पॅटर्न'? राजेश टोपे यांची केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा 
मुंबई

राज्यात 'केरळ पॅटर्न'? राजेश टोपे यांची केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केरळने राबवलेल्या उपक्रमांचा अभ्यास राज्य सरकार करणार आहे. त्यानंतर राज्यातदेखील "केरळ पॅटर्न' राबवण्यासाठी विचार करणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

कोरोना प्रतिबंधासाठी केरळ राज्याने कशाप्रकारे उपाययोजना राबवल्या आहेत याची माहिती घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. केरळमधील लोकसंख्येची घनता तेथील भौगोलिक, सामाजिक रचना आणि महाराष्ट्राची रचना यात बऱ्यापैकी अंतर आहे; मात्र केरळच्या आरोग्य विभागाकडून जे काही अभिनव उपक्रम हाती घेतले, त्याचा राज्यात वापर करण्याविषयी विचारविनिमय केला जाईल असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केरळने काय विशेष उपाययोजना केल्या याविषयी जाणून घ्यायला आवडेल, असे सांगत आरोग्यमंत्री टोपे यांनी चर्चेला सुरुवात केली. केरळमध्ये दिवसाला १२०० च्या आसपास चाचण्या होत असून तेथे १२ ते १३ प्रयोगशाळा असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घेत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना राज्यात आतापर्यंत ६१ प्रयोगशाळांच्या माध्यमातून पावणेतीन लाख चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. केरळचे विलगीकरणाचे धोरण, दर दिवसाला होणाऱ्या चाचण्या, झोपडपट्ट्यांमधील संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, खासगी डॉक्‍टरांचे सहकार्य, साधनसामुग्रीचा तुटवडा, कंटेन्मेंट झोनमधील प्रतिबंध, प्लाझ्मा थेरेपीचा वापर याविषयी या वेळी चर्चा करण्यात आली. लोकसंख्या आणि तिची घनता यात दोन्ही राज्यांमध्ये कमालीची भिन्नता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केरळचे आरोग्य विभागाचे सचिव श्री. खोब्रागडे उपस्थित होते.

नागरिकांचे समुपदेशन
केरळमधील रुग्ण संख्याही कमी असून तेथे खाटांची कमतरता नाही. मानसोपचार तज्ज्ञांचे गट करून त्यांच्यामार्फत विलगीकरण केलेल्या लोकांची तसेच आरोग्य कर्मचारी यांचे समुपदेशन केले जाते. त्याचबरोबर तेथील प्रसिद्ध अभिनेते, खेळाडू, ख्यातनाम व्यक्ती यांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार आहेत, अशा लोकांना (कोमॉर्बीड) घराबाहेर पडू दिले जात नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT