'या' व्यवसायावर आलीये संक्रांत! ...५० टक्‍क्‍यांनी विक्री घटली  
मुंबई

'या' व्यवसायावर आलीये संक्रांत! ...५० टक्‍क्‍यांनी विक्री घटली

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : तरुणाईच्या आवडी-निवडीमध्ये झालेले बदल, महागाई आणि पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी पंतग उडविण्याविरुद्ध सुरू असलेली जनजागृती, समाजमाध्यमांवरील खेळ या विविध कारणांमुळे यंदा पतंग-मांजावर संक्रांत आली आहे. एकेकाळी संक्रांतीच्या आठवडाभर आधीपासून पंतगशौकिनांच्या गर्दीने फुलून जाणारी दुकाने यंदा ओस पडली आहेत. यंदा पतंग-मांजाच्या विक्रीमध्ये तब्बल 50 टक्‍क्‍यांनी घट झाली असून, विक्रेते चिंतेत आहेत.

मागील काही वर्षांमध्ये तरुणाई मोबाईलसह संगणकाच्या महाजालात अडकली आहे. तासनतास संगणक व मोबाईलवर खेळ खेळण्यात गुंग झालेल्या तरुणांना मैदानी खेळांचा विसर पडला आहे. परिणामस्वरूप पतंग उडविण्यातही तरुणांना रस राहिलेला नाही. मागील पाच वर्षांमध्ये पतंग व मांजाविक्रीमध्ये मंदी आली आहे. यंदा तर 50 टक्‍क्‍यांनी विक्री घटली आहे, अशी व्यथा पतंग विक्रेते अभुगफर नेमन यांनी मांडली. पूर्वी ऑक्‍टोबर महिना उजाडल्यानंतर आकाशात पतंग भिरभिरू लागायचे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण पतंग आणि फिरकी घेऊन पंतग उडवायचे. मकर संक्रांत म्हणजे पंतगशौकिनांसाठी तर पर्वणीच असायची. पतंग व मांजा खरेदीसाठी संक्रांतीच्या आठवडाभर अगोदरपासून दुकानांमध्ये गर्दी असायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. शौकिनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. पूर्वी पतंग घेण्यासाठी येणाऱ्या शौकिनांनीदेखील आता पाठ फिरवली असल्याचे विक्रेते अभुगफर नेमन म्हणाले. 

कारागीरांचा अभाव 
पतंगनिर्मितीच्या कामामध्ये कौशल्याची आवश्‍यकता आहे. एकेकाळी पंतग बनविणारे कसबी कारागीर होते; परंतु काळाच्या ओघात या कारागीरांची संख्या घटत गेली आणि मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला. सध्या पतंग बनविणाऱ्या कारागीराला दिवसभरासाठी 300 ते 400 रुपये दिले जातात. मात्र, अन्य ठिकाणी काम केल्यावर 500 ते 600 रुपये रोजंदारी मिळत असल्याने कारागीर पतंगनिर्मितीचे काम करायला तयार होत नाहीत. परिणामी, कारागीरांचा अभाव हीदेखील एक मोठी समस्या या व्यावसायिकांना भेडसावू लागली आहे. एकेकाळी पन्नास पैशांना पंतग मिळत होता; परंतु आज तोच पतंग 15 रुपयांना मिळू लागला आहे. वाढत्या महागाईचा हा परिणाम असल्यामुळे आता हा व्यवसायच अडचणीत येऊ लागला आला आहे, असे अभुगफर नेमन यांनी सांगितले. 

नागरिकांचा अल्प प्रतिसाद 
विक्रेत्यांनी हार न मानता अनेक वेगवेगळ्या आकाराचे फॅन्सी पतंग, लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी डोरेमॉन, छोटा भीम, मोटू-पतलू, लिटिल सिंगम, बटरफ्लाय, एरोप्लेन पतंग; तर नायलॉन मांजाला "पर्याय' म्हणून इजा होणार नाही, अशी "बारा तार' मांजा बाजारात आणत पतंगप्रेमींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कट्टर पतंगप्रेमींचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी थंड प्रतिसाद पाहायला मिळाला. याबाबत पतंग विक्रेत्यांशी संवाद साधला असता, 'लोग आते ही नही है!' किंवा 'गेल्या वर्षी तरी ठीक होतं. यंदा मात्र धंदा बसलाय' अशीच उत्तरे मिळत आहे. 

पतंगाचा वापर डेकोरेशनसाठी मकर संक्रांत आल्यामुळे कार्यालय; तसेच घरांमध्ये सजावटीसाठी केला जातो. त्यासाठी छोटे पतंग बाजारात आले आहेत. 100 पतंग 350 रुपयांना मिळत आहेत; तर सजावटीसाठी असणाऱ्या पतंगाला जास्त मागणी आहे. 
- रामजी गौडा, विक्रेते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT