‘...यामुऴे’ होतीये नवी मुंबईकरांची घुसमट?  
मुंबई

‘...यामुऴे’ नवी मुंबईकरांची होतीये घुसमट?

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून कोपरी गाव, सेक्‍टर- 26 परिसरातील नागरिकांना रासायनिक दुर्गंधीयुक्त वासाचा त्रास वाढू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे दुर्गंधीयुक्त वायू सोडणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी सेक्‍टर- 26 मधील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेट्ये यांनी केली आहे. 

रबाळे, महापे व पावणे औद्योगिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या रासायनिक कारखान्यातून सातत्याने रासायनिक द्रव्यमिश्रित पाणी सोडले जात आहे. तसेच रात्री वायू सोडले जातात. त्यामुळे परिसरात वायुप्रदूषण होऊन नागरिकांना श्वास घेण्यास अडचणी येत असल्याची माहिती सेक्‍टर 26, व कोपरी गावातील नागरिकांनी दिली आहे. कोपरी गावाजवळून सांडपाणी वाहून नेणारे एमआयडीसीचे दोन नाले जात आहेत. एक मुख्य नाला असून, त्यालाच जोडणारा आणखी एक उपनाला कोपरीगाव परिसरातून जातात. या नाल्यातून रोज सकाळी पांढरे, काळे, लाल, राखाडी, हिरवे अशा प्रकारच्या निरनिराळ्या रंगाची रासायनिक द्रव्ये सोडली जातात. प्रक्रिया न करताच बरेचसे द्रव्य सोडण्यात आल्याने नाल्यालागत असणाऱ्या वृक्ष, वनस्पती, जैविक जीव; तसेच खाडीतील मासेमारीवरदेखील संकट आल्याची माहिती समोर आली आहे.

अप्रक्रियाकृत द्रव्य व रात्री दुर्गंधीयुक्त वायूचा त्रास कोपरी गाव व सेक्‍टर- 26 मधील नागरिकांना होत आहे. यामुळे उलटी, मळमळ होणे, डोके दुखणे आणि छाती भरणे असा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे अशा प्रकारे रसायनमिश्रित द्रव्य व दुर्गंधीयुक्त रसायन सोडणाऱ्या कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेट्ये यांनी केली आहे. 

कोपरी गावाशेजारील नाल्यातून रोजच रसायनमिश्रित द्रव्य सोडले जाते. रात्री दुर्गंधीयुक्त वायूचा वास रोज येत असतो. त्यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास होत असून, आरोग्य धोक्‍यात आले आहे. तेव्हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रदूषण मंडळाने नाल्यात दुर्गंधीयुक्त रसायन सोडणाऱ्या व वायुप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर वेळीच कारवाई करावी. 
- सुरेश शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : काँग्रेस दिशाहीन, किरेन रिजिजू यांची टीका

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT