Mumbai University
Mumbai University Sakal media
मुंबई

चार वर्षांच्या काळात आयडॉलचे विद्यार्थी घटले; प्रशासनाचे विकासकामांकडे दुर्लक्ष ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) दूर व मुक्त अध्ययन संस्थेत मागील चार वर्षांच्या काळात विद्यार्थी संख्या (Less students in idol) घटली असून विद्यापीठ प्रशासनाने याबाबतच्या विविध विकासकामांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप सिनेट सदस्य (senate member) वैभव थोरात यांनी केला आहे. ९० हजारांच्या दरम्यान विद्यार्थी येथे शिक्षण घेत होते. ती संख्या चार वर्षांत ६० हजारांच्या आसपास आल्याचे या वेळी सांगण्यात आले.

विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या सिनेटमध्ये थोरात यांनी आयडॉलवर एक स्थगन प्रस्ताव आणून हा आरोप केला. आपण तब्बल सहा वेळा हा विषय सिनेटमध्ये आणला असल्याची आठवणही करून दिली. विद्यापीठाला सर्वाधिक महसूल उपलब्ध करून देण्यासाठी आयडॉलने आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे येथे दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यासाठी आपण असंख्य पत्र आणि त्यासाठीची मागणी केली असताना चार वर्षांच्या काळात केवळ पाच अभ्यासक्रमांवरच काम करण्यात आल्याची माहिती थोरात यांनी दिली.

दरम्यान, यावर विद्यापीठाकडून आयडॉलसाठी असलेल्या अडचणी मान्य करत यावर लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. आयडॉलमध्ये देशभरातील विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आदीचे शिक्षण घेतात. येथे पदवी घेतलेले शेकडो विद्यार्थी आज परदेशात जाऊन नोकरी आणि शिक्षणही घेत आहेत. मात्र मागील चार वर्षांत आयडॉलच्या उपकेंद्राचा विषयही अर्धवट ठेवण्यात आला. शिवाय परीक्षा केंद्र वाढवण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष झाले तर प्राध्यापक भरतीही रखडून ठेवण्यात आली. यामुळे आयडॉलकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

शिक्षणाचा सुलभ मार्ग

आयडॉलमुळे हजारो विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण सुलभपणे घेता येते. शिवाय आयडॉलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही खूप चांगल्या प्रकारे मिळते. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने यापुढे आयडॉलच्या शैक्षणिक विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी नवीन अभ्यासक्रम आणावेत, अशी मागणी या वेळी सिनेट सदस्य महादेव जगताप, प्रवीण पाटकर, डॉ. सुप्रिया करंडे, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचाडे आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT