Uddhav Thackeray 
मुंबई

Maharashtra Budget 2023: "गाजर हलवा अर्थसंकल्प" अशा शब्दांत उद्धव ठाकरेंची बजेटवर टीका

राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडला. पण हा अर्थसंकल्प विरोधकांना रुचलेला नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणूक जुमला असल्याचं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलंय तर हा 'गाजर हलवा अर्थसंकल्प' असल्याचं शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. (Maharashtra Budget 2023 Uddhav Thackeray criticism of budget says Gajar Halwa budget)

उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात कोरोनाचं संकट होतं. या काळात प्रत्येकवेळी केंद्राकडं साधारण २५००० कोटींची जीएसटीची थकबाकी बाकी असायची. आज सकाळीच मी संभाजीनगरमधील काही शेतकऱ्यांशी बोललो. अवकाळी पाऊसाचे पंचनामे करायला त्यांच्या बांधावर एकही शेतकरी गेलेला नाही. एकूणच आजचा अर्थसंकल्प म्हणजे सर्व समाजातील घटकांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे.

अवकाळी पाऊस झाला तसा मुंबईत गडगडाटही झाला पण पाऊस काही झाला नाही. त्यामुळं हा अर्थसंकल्प गरजेल तो बरसेल काय असा आहे. एका वाक्यात सांगायचं तर गाजर हलवा अर्थसंकल्प असा मी याचा उल्लेख करेल. कारण यातून बऱ्याचशा योजना या आम्ही जाहीर केल्या होत्या त्याचचं नामांतर करुन पुढे मांडल्या आहेत.

एक गोष्ट बरी आहे की एक योजना आम्ही मुंबई महापालिकेच्यावतीनं मुंबईत सुरु केली ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. ही योजना आमची त्यावेळी यांना फीता कापायचं भाग्य मिळायचं. पण आता ही योजना राज्यभर राबवणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT