maharashtra government bhagat singh koshyari announces aid to farmers
maharashtra government bhagat singh koshyari announces aid to farmers 
मुंबई

राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर; पाहा अशी मिळणार मदत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांकडून अखेर मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्‍टरपर्यंतच्या जिरायती शेतीवरील पिकांसाठी एक हेक्‍टरला आठ हजार रुपये, तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची प्रतिहेक्‍टरी मदत घोषित करण्यात आली आहे. ही मदत जुन्या निकषाला अनुसरूनच जाहीर करण्यात आली आहे. 

तात्काळ मदत देण्याचे आदेश 
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे मागणी केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधांवर जात नुकसानीची पाहणी केली होती. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्‍टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी आठ हजारांची प्रतिहेक्‍टरी मदत; तर बागायत शेतीसाठी, फळबागांसाठी 18 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना तत्काळ देण्याचे निर्देश राज्यपाल कोशियारी यांनी दिले आहेत. याशिवाय, नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा शेतसारा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. राज्यातील 325 तालुक्‍यांत अनेक ठिकाणी 90 ते 100 टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पावसाच्या कहरामध्ये सोयाबीन, कापसासह खरिपाची पिके पाण्यात गेली होती. 

मदत आणि निकष 

  1. जिरायती शेतीवरील पिकासाठी प्रतिहेक्‍टरी ः आठ हजार रुपये 
  2. बागायती, बारमाही, फळबागासाठी प्रतिहेक्‍टरी ः 18 हजार रुपये 
  3. ही मदत फक्‍त दोन हेक्‍टरपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT