मुंबई

केंद्राच्या धर्तीवर राज्यातही 'पाच दिवसांचा आठवडा' सुरु करण्याच्या हालचाली

प्रशांत बारसिंग

मुंबई : राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे यासह राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. यावेळी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. 

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव नितिन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी कुलथे यांनी महासंघाच्या विविध मागण्या मांडल्या. केंद्राप्रमाणे राज्यात पाच दिवसांचा आठवडा करावा या मागणीवर मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी शासन विचाराधीन आहे. 45 मिनिटे वाढवून, अत्यावश्‍यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करावा. त्यावर निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

राज्यात रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात महिलांसाठी विश्रामकक्ष, महिला अधिकाऱ्यांसाठी चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत धोरण ठरविणे, विश्रामगृहांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी आरक्षण ठेवणे या मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. ज्या मागण्यांवर तातडीने निर्णय होणे शक्‍य आहे त्या प्रलंबित ठेवू नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

वेतन त्रुटीबाबत खंड -2 अहवाल तातडीने सादर करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. त्यावर हा अहवाल महिन्या दीड महिन्यात सादर केला जाईल, असे कुंटे यांनी यावेळी सांगितले. महागाई भत्त्याची थकबाकी देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. 

maharashtra state government is planing to start five days a week in maharashtra
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NASA: पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतंय 'ब्रह्मास्र'! विनाश वाचवण्यासाठी 'नासा' करतंय ३० हजार कोटींचा खर्च, इतिहासातली पहिलीच घटना

Heritage Tourism: जुन्या वाड्यांना मिळणार पर्यटनाचा नवा चेहरा! सरकार देणार ४० कोटींपर्यंत अनुदान आणि करसवलतींचा लाभ, काय आहे योजना ?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय महामार्गाला ओढ्याचं स्वरुप, अभियंत्याचा मृत्यू

Ulhasnagar: महिला दिनाच्या ३ तासाच्या कार्यक्रमाला २२ लाख खर्च, ५० जणांना फेट्यासाठी ७५ हजार, तर नाश्ता अन् जेवणाचे १० लाख

तामिळनाडूत पक्षफुटीचे लोण! मुख्यमंत्री विजय यांचा AIDMKला धक्का, सहाव्या आमदाराचा राजीनामा; TVKमध्ये प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT