मुंबई

मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळख असणाऱ्या डबेवाल्यांनी सुरु केली 'ही' नवी सेवा...

- सुनीता महामुणकर

मुंबई : मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डबेवाल्यांंनी आता लॉकडाऊनला संधी म्हणून पाहण्याचे ठरविले आहे. एरव्ही फक्त घरचा जेवणाचा डबा पोहचविणारे डबेवाले आता गरमागरम जेवणही दक्षिण मुंबईतील चाकरमान्यांसाठी उपलब्ध करणार आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचा प्रार्दुभाव आहे. मात्र सरकारी आणि खासगी कार्यालये काही प्रमाणात सुरू आहेत. हॉटेल आणि उपहार गृहदेखील मर्यादित स्वरूपात सुरु आहेत. अशावेळी मुंबई डबेवाला असोसिएशनने खाणावळीची विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

संघटनेच्या वतीने दुपारच्या जेवणाचा डबा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात मोटार सायकलवरून पोहचविण्यात येणार आहे. सध्या ही सेवा दक्षिण मुंबईमध्ये सुरु करण्यात आली आहे. चपाती, भात, वरण, भाजी, लोणचे आदीचा यामध्ये समावेश आहे आणि सर्व स्वच्छता पाळून पदार्थ बनविले जातात, असे दत्तात्रय ढेरंगे यांनी सांगितले. ढेरंगे आणि अजय वाळुंज यांनी सुरू केलेल्या या सेवेला प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन संपला की उर्वरित भागांमध्ये ही सेवा पुरविण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. 

लॉकडाऊनमुळे डबे बंद झाले. त्यामुळे पर्यायी काम म्हणून खाणावळीचा विचार केला. लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये नोकरीसाठी येणाऱ्यांची खाण्याची आबाळ होता कामा नये, या हेतुने हा निर्णय घेतला, असे ढेरंगे म्हणाले. रेल्वेगाड्या आणि कार्यालये बंद असल्यामुळे डबेवाल्यांंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण पर्यायी कामे करीत आहेत, असे ते म्हणाले.

( संकलन - सुमित बागुल )

manegment guru mumbais dabbawal starts their food mess in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT