pani-puri-wala. 
मुंबई

आपुलकीचे उत्तम उदाहरण..! पाणीपुरी विक्रेत्याच्या कुटुंबियांसाठी मुंबईसह जगभरातून सरसावले मदतीचे शेकडो हात...

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनासारख्या आजारामुळे माणसातील माणुसकीची भावना संपल्याचे अनेक उदाहरणे आपल्या वाचनात आली असेल, किंवा अनुभवलीही असेल. एवढेच नव्हे तर सख्ख्या नातेवाईकांकडूनही कोरोना बाधित कुटुबांची अवहेलना झाल्याची उदाहरणे समोर आलीत. मात्र, एक आगळेवेगळे उदाहरण मुंबईत अनुभवायला मिळाले. कोणतीही ओळख नसताना, कोणतेही नातेसंबंध नसताना एका पाणीपुरी विक्रेत्याच्या कुटुबांला मदत म्हणून जगभरातून मदतीचे हात समोर आले.

मुंबईतील एका पाणीपुरी विक्रेत्यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांच्या पाणीपुरीचे चाहते असलेल्यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी उभारण्याचे ठरवले. त्यांच्या मदतीसाठी केवळ मुंबईतूनच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनी थेट ब्रिटन, अमेरिकेतून मदत पाठवली. त्यामुळे ही मदत अवघ्या काही दिवसात तीन लाखांपर्यंत गेली. 

भगवती यादव हे मुंबईतील नेपीयन सी रोडवर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत. रुंगठा लेनमध्ये संध्याकाळी पाच ते नऊ त्यांचा ठेला तब्बल 46 वर्षे सुरु होता. त्यांची पाणीपुरी परिसरात चांगलीच लोकप्रिय होती. मात्र, सर्वत्र हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने त्यांनाही गाठले. दुर्देवाने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच त्यांचे असंख्य ग्राहक हळहळले. त्यांनी समाजमाध्यमावरुन त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी आवाहन केले.
 
हात दिला की खांद्यावर बसायचं ! पनवेलमध्ये बारचालक आता काय करतायत वाचा...

नेपीयन सी रोड परिसरातील अनेकांनी येथील लहानपणापासून येथील पाणीपुरीचा आस्वाद घेतला आहे. त्यातील काहींनी तर आमच्या जन्मापू्र्वीपासून ही पाणीपुरी प्रसिद्ध होती. कितीही उन असो, पाऊस असो, थंडी असो ही पाणी पुरी मिळत असे. पाणीपुरीसाठी चक्क ते मिनरल पाण्याचा वापर करत असल्याने स्वच्छता कमालीची होती. त्याशिवाय पाणीपुरीची चव इतकी वर्ष कायम होती, असे त्यांनी सांगितले. 

यादव यांचे कुटुंबिय उत्तर प्रदेशात असते. त्यांना पैशाची नितांत गरज असेल असा विचार समोर आला. समाजमाध्यमातून करण्यात आलेल्या आवाहनास पहिल्या दिवशी 40 हजार रुपयांचा प्रतिसाद लाभला. ही मदत अवघ्या काही दिवसात तीन लाखांपर्यंत गेली. यादव यांच्या कुटुंबियांसाठी ही मदत अनपेक्षित होती. माझ्या वडिलांवर अनेकांचे प्रेम होते, त्यांनी केलेली ही मदत आमच्यासाठी खूपच मोलाची आहे, असे त्यांची मुलगी कुसुम हिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RR: राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल! मुबंई इंडियन्सने हरली अन् पंजाब - कोलकाताचंही स्वप्न तोडलं

Karnataka River Drowning Accident : नदीच्या प्रवाहात अचानक वाढ, शिंपले गोळा करण्यासाठी गेलेले ८ जण बुडाले; ७ महिलांचा समावेश

Jalna Water Crisis: अंबड तालुक्यातील मसई गावात पाण्यासाठी जीवघेणी कसरत; विजपंप बंद, ग्रामस्थांची उन्हात तहानलेली धावपळ

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR ला धक्का! १८ कोटींचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर; शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी बदली खेळाडूची घोषणा

Latest Marathi News Live Update : चांदवड-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; वाहन उलटून २१ मजूर जखमी

SCROLL FOR NEXT