मुंबई

रूग्णालये, नको रे बाबा..; कोरोनाच्या भीतीमुळे नॉन कोव्हिड रुग्णांची शस्त्रक्रियांकडे पाठ

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील कोरोना संसर्ग आता बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे रूग्णालयांवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र असे असले तरी सध्या नॉन-कोव्हिड रुग्णांना रुग्णालयात जाण्यास घाबरत असल्याने त्यांनी रूग्णालयांकडे पाठ फिरविल्याचे दिसते. जुलै आणि ऑगस्टमध्ये अत्यावश्यक आणि निवडक किरकोळ शस्त्रक्रिया केवळ 30 ते 40 टक्के वाढल्या. त्यामुळे अजूनही 50 टक्के बेड रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाची अनेक लोकांना भीती वाटते. त्यामुळे कोरोना रूग्णांवर उपचार होणाऱ्या रूग्णालयात लोकं जायला तयार होत नाहीत. भाटीया रूग्णालयाने  कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड रूग्णांसाठी स्वतंत्र विभाग तयार केले आहेत. तरीसुद्धा लोकं रुग्णालयात येण्यास घाबरत असल्याचे भाटिया रुग्णालयाचे संचालक (वैद्यकीय) डॉ. आर. दस्तूर यांनी सांगितले. कोरोनापूर्वी ताडदेव येथे 200 खाटांची सुविधा असलेल्या ठिकाणी दिवसाला जवळपास 25 शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र सध्या दररोज केवळ 4 ते 5 शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णालयाला नुकसान सोसावे करावा लागत असल्याचे ही दस्तूर म्हणाले.

जसलोक हॉस्पिटलमध्ये महिन्याला सरासरी 700-800 शस्त्रक्रिया होत होत्या. त्यात आता मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मे महिन्यात 89 पर्यंत गेल्या, जूनमध्ये त्या  157 झाल्या आणि हे प्रमाण जुलैमध्ये 289 पर्यंत वाढले. मात्र अजूनही त्या सुरळीत झालेल्या नाहीत. तसेच मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलने एक महिन्यापूर्वी नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी स्वतंत्र 30 बेडची व्यवस्था सुरू केली होती, परंतु अद्याप शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात झालेली नाही.

नानावटी रूग्णालयात महिन्यात सरासरी 600 शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र एप्रिल महिन्यात 78 टक्के, मे महिन्यात 82 टक्के आणि जूनमध्ये 81 टक्क्यांनी घट झाली. जुलैमध्ये काही सुधारणा झाली असली तरी त्या 73 टक्के कमीच होत्या. अनलॉक केल्याने गोष्टी सुधारल्या पण त्या अजूनही सुरळीत झालेल्या नाहीत. कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्र इमारत ठेवल्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलला मदत मिळाली. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान 411 शस्त्रक्रिया झाल्याचे डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले. लोकांच्या सुरक्षेच सर्व काळजी घेत असून त्याबद्दल लोकांमध्ये जागृती करत असल्याचे डॉ गौतम भंसाली पुढे म्हणाले.

सायन रुग्णालयात एका दिवसात 80 ते 100 मोठया आणि किरकोळ शस्त्रक्रिया होत होत्या, आता या शस्त्रक्रिया 300 हून अधिक होऊ लागल्या आहेत. "आम्ही जवळपास एका आठवड्यापूर्वी नियमित काम सुरू केले आणि कोरोना रूग्णांना जंबो सेंटरमध्ये हलविण्यास सूरूवात केली. आता पुढे त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय 

----
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT