labour 
मुंबई

...अन् मुंबई ते गोरखपूर ते पायीच निघाले

सकाळवृत्तसेवा

चेंबूर (बातमीदार) : लाॅकडाऊन लागू होऊन महिन्याहून अधिक काळ उलटला. कारखाने बंद आहेत. हाताला काम नाही. सरकारने रेल्वे गाड्या सोडल्या; पण त्याचे भाडे कसे द्यायचे. अटींचे काही समजेना. तपासण्यामुळे तर आणखीच भिती निर्माण होत आहे. त्यामुळे आता आम्ही 100हून अधिक जण मस्जिद बंदरहून उत्तर प्रदेशला 1600 किलोमीटर पायीच जात आहोत, असे चेंबूर येथे एका पुलाखाली विश्रांतीसाठी काही वेळ थांबलेल्या मजुरांनी सांगितले.    

कोरोना विषाणुमुळे देशाची आर्थिक राजधानी ठप्प झाली. रोजगाराच्या शोधात मुंबईत आलेल्या परप्रांतीय मजूरांनी काहि दिवस कसेबसे काढले; मात्र आता दिड महिन्यानंतर मुंबई कधी सुरू होईल, याची शाश्वती नसल्याने हवालदिल झालेल्या कामगारांची गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. मिळेल ते वाहन किंवा पायीच ते गावाकडे निघत आहेत. 

आज मशिद बंदर येथून शंभरच्या आसपास मजूर उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे पायीच निघाले होते. ते चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीजवळ काही वेळ विश्रांतीसाठी थांबले होते. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता शहरात आता आरोग्याची भिती वाटत आहे, असे अनेकांनी सांगितले. आजारी पडल्यावर उपचार तरी मिळतील का? याची शाश्वती नाही. तुम्ही जिवंत तरी आहात का, अशी गावाकडून रोज विचारणा होते. त्यामुळे आम्ही आता सरळ आपल्या मार्गाने 1400 किलोमीटर चालत जाणार. कधी पोहोचू माहित नाही; मात्र आम्हाला सरकारने मध्येच अडवू तरी नये, असेही या कामगारांनी बोलून दाखवले. 

सरकारची प्रक्रिया किचकट
सरकारने मजुरांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सोडल्या असल्या तरी त्याचे अर्ज भरण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागते. दवाखान्याकडूनही सर्टिफिकेट लागते. ही किचकट प्रक्रिया समजत नाही आणि आता खर्चाचीही ऐपत नाही, असे मजुरांनी सांगितले. आता वैद्यकिय प्रमाणपत्र आवश्यक नसल्याचे त्यांना सांगितल्यावर याबद्दल अजून माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT