boat
boat 
मुंबई

सागरी मार्गाने लॉकडाऊन मोडणाऱ्यांवर पोलिसांची पाळत

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परदेशाप्रमाणेच मुंबई-पुणे येथून येणाऱ्यांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. मुंबईहून येणारे आता सागरी मार्गाचा अवलंब करण्याची शक्‍यता असल्याने सागरी मार्गावरील गस्तीत वाढ करण्यात आली आहे. 

सध्या नागरिकांमध्ये कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही. कोरोनाच्या भीतीने नागरिक सध्या गावाकडे परतत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांचा रस्त्यांवर ठिकठिकाणी बंदोबस्त असताना सागरी मार्गाने संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी तेथेही पोलिसांनी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सेवांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. मोकाटपणे रस्त्यांवरून वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच वाहने जप्त केली जात आहेत. काही वाहनचालकांना तर उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली जात आहे. 

रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त असताना सागरी मार्गाने कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे रायगडचे पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सागरी सुरक्षा विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मांडवा सागरी, अलिबाग, रेवदंडा, दिघी, श्रीवर्धन अशा अनेक महत्त्वाच्या बंदरांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. पोलिसांमार्फत सागरी गस्त ठेवण्यात आली आहे. मच्छीमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून बाहेरील कोणी आल्यास तातडीने पोलिसांना कळविण्यात यावे, असे आवाहनही केले आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, कोस्टल गार्ड, सागरी रक्षकांना माहिती घेण्यास सांगण्यात आले आहे. 

 
जलवाहतूक सेवा बंद आहे; मात्र सागरी मार्गाने कोणीही येऊ नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सागरी नौका गस्तांमार्फत पाहणी सुरू आहे. 
- अनिल पारसकर, पोलिस अधीक्षक, रायगड 

जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. सध्या खाडीमधून ओला जवळा मिळतो. हा जवळा सुकवण्यासाठी मनुष्यबळ अधिक लागतो. नियमामुळे मासेमारी करणे कठीण झाले आहे. 
- शेषनाथ कोळी, अध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT