Mega block on Sundays Central and Harbor Railway lines local train
Mega block on Sundays Central and Harbor Railway lines local train  Sakal
मुंबई

Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १२ मार्च २०२३ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे- माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग

कधी - सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढील असलेल्या या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. ठाणे येथून अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

हार्बर रेल्वे

कुठे - सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप- डाउन हार्बर मार्गावर

कधी- सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४०वाजेपर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि वांद्रे/गोरेगाव येथून सीएसएमटीकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटी करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा सुरु राहणार आहे. गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप- डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT