maratha reservation 
मुंबई

मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक; काय झालं बैठकीत वाचा सविस्तर...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : येत्या मंगळवारी (ता. 7) पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार असून, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज वरिष्ठ विधीज्ज्ञांसमवेत बैठक झाली. 

सर्वोच्च न्यायालयातील न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठात 7 जुलै रोजी नियोजित असलेल्या सुनावणीच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीने सुनावणीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही सुनावणीच्या अनुषंगाने यावेळी विस्तृत चर्चा झाली. शनिवारी सकाळी झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे वरिष्ठ विधीज्ज्ञ मुकुल रोहतगी, परमजितसिंग पटवालिया, विजयसिंह थोरात, अनिल साखरे सहभागी झाले होते.

मराठा आरक्षणाचे विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आहे. याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल, असे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले. उपसमितीच्या 23 जून रोजी झालेल्या बैठकीत सुनावणीपूर्वी वरिष्ठ विधीज्ञांसमवेत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आजची बैठक झाली असून यापूर्वी 29 फेब्रुवारी 2020 रोजी देखील उपसमितीने मुकूल रोहतगी यांच्यासमवेत बैठक घेतली होती, अशीही माहिती त्यांनी दिली.

आजच्या बैठकीला विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, विधी विभागाचे सहसचिव भुपेंद्र गुरव, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टिकाराम करपते, रसिक खडसे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या सीईटी सेलचे डॉ. व्यास आदी प्रमुख अधिकाऱ्यांसह वकील अक्षय शिंदे, वैभव सुखदेवे, राहुल चिटणीस, सचिन पाटील आदी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर गोविंदा पत्नीपासून वेगळा होणार, सुनीताने वांद्रे कोर्टात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज; कोणकोणते आरोप केले?

Ganesh Chaturthi 2025 : 'या' गणेश चतुर्थीला एक-दोन नाही तर बनत आहेत 5 महायोग; या राशींवर बाप्पा होणार खुश

Video: थरारक! पवई तलावामध्ये मगरीने कबुतराला गिळले; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Hidden Liver Damage: लक्षणं न जाणवता यकृत होतंय कमजोर… ‘सायलेंट किलर’बाबत डॉक्टरांचा धोक्याचा इशारा!

Sharad Pawar: उपराष्ट्रपतीसाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्या, मुख्यमंत्र्यांचा मला फोन, खुलासा करत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT