मुंबई

घोरपडीने केली चक्क आझाद मैदानात सैर; शिकारीची होती शक्यता...

मिलिंद तांबे

मुंबई : एरवी गावखेड्यात-डोंगर कपारीत सापडणारी घोरपड चक्क मुंबईतील आझाद मैदानात सापडली. याबाबत सर्पमित्रांना माहिती मिळताच त्यांनी ही घोरपड पकडून तिला वन विभागाच्या ताब्यात दिले.

रविवारी आझाद मैदान पोलिस ठाण्यात घोरपड आली असता पोलिस उपनिरीक्षकांनी सर्पमित्र गणेश साळुंखे यांच्याशी संपर्क केला. साळुंखे यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिस ठाण्याच्या बाथरूममधून घोरपड सुरक्षितरित्या पकडली. साळुंखे यांना ही घोरपड काहीशी जखमी अवस्थेत आढळली. सोमवारी घोरपडीला वन विभागाच्या मदतीने निर्सगाच्या सानिध्यात सोडण्यात आले.

रविवारी गटारी असल्याने निमित्ताने मटण-चिकनवर ताव मारण्याचे प्रमाण अधिक असते. घोरपडीचे मटण हे औषध असल्याचा समज असल्याने त्यासाठी घोरपडीची शिकार केली जाते. कदाचित त्याप्रकारेच आठवड्याभरपूर्वी घोरपड पकडून आणली असावी,  अशी शक्यता घोरपडीवर असलेल्या जखमेच्या आधारे सर्पमित्र गणेश साळुंखे यांनी वर्तविली.

घोरपड हा प्राणी डोंगराळ भागात, जंगली भागात आढळतो. गेल्या 20 वर्षांत मला मुंबईत एकदाही घोरपड पकडण्यासाठी बोलवण्यात आले नव्हते.  पकडलेली घोरपड काहीशी जखमी होती. तिला डीहायड्रेशनचा त्रास जाणवत असल्याचे लक्षात आल्याने एक दिवस तिला प्राथमिक उपचार देत निर्सगाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
- गणेश साळुंखे, सर्पमित्र.

---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT