Air India and IndiGo aircraft seen parked at Mumbai Airport after their wings reportedly collided during ground movement, preventing a major aviation accident.
esakal
Air India and IndiGo Aircraft Wing Collision Occurred at Mumbai Airport : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज(मंगळवार) एक भीषण विमान दुर्घटना सुदैवाने टळली. कारण, विमानतळाच्या धावपट्टीवर जवळील टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन विमानांच्या पंखांचे (विंगटिप्स) परस्परांमध्ये धडकले. एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून पुशबॅक करत असताना लँडिंगनंतर टॅक्सी करणारे इंडिगो विमान त्याच्या जवळ आले आणि दोन्ही विमानांचे पंख एकमेकांवर आदळले.
या घटनेनंतर एकच खळबळ उडाली परिणामी, सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही विमाने ग्राउंड करण्यात आली. सुदैवानी कोणतीही भीषण दुर्घटना घडली नाही आणि कोणत्याही प्रवाशास दुखापतही झाली नाही. मात्र या घटनेची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे विमानतळावरील कामकाजावर तात्पुरता परिणाम झाल्याचे दिसून आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, एअर इंडियाचे मुंबईहून कोयंबतूरसाठी जाणारे विमान एआय २७३२ उड्डाणाची तयारी करत टॅक्सीवेवर थांबले होते.त्याचवेळी हैदराबादहून मुंबईत पोहोचलेली इंडिगोची फ्लाइट ६ई ७९१ लँडिंग केले होते.याचवेळी दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांमध्ये घासले गेले, ज्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या विंगटिपला नुकसान झाले आहे.या घटनेनंतर DGCA च्या मुंबई कार्यालयातील अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले असून आणि अधिक तपास सुरू आहे.
इंडिगोने सांगितले की, हैदराबादहून मुंबईसाठी चाललेल्या आमच्या ६ई ७९१ विमानाचे एक विंगटिप ३ फेब्रुवारी २०२६ रोजी लँडिंगनंतर दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाशी धडकले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि पार्किंगनंतर उतरले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्यात आले असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आमच्यासाठी ग्राहक, क्रू आणि विमानांची सुरक्षितता आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
तर एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ३ फेब्रुवारी रोजी मुंबईहून कोयंबतूरसाठी चाललेल्या एआय२७३२ विमानाला उड्डाणापूर्वी टॅक्सीवेवर थांबलेल्या अवस्थेत दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाशी धडकल्यामुळे विलंब झाला. दोन्ही विमानांच्या विंगटिप्समध्ये धडक होऊन आमच्या विमानाच्या विंगटिपला नुकसान झाले.
खबरदारीच्या उपाययोजनेअंतर्गत, विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी केली जात आहे. सर्व प्रवासी सुरक्षित उतरवण्यात आले असून आमची टीम त्यांना शक्य तेवढ्या लवकर गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहेत. एअर इंडियाला या घटनामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल खेद वाटतो. आमच्या प्रवासी आणि क्रूची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.