BMC Election
ESakal
bmc election 2026 Hafta Vasuli 2.0: महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबईतील राजकीय वातावरण हप्ता वसुलीच्या मुद्य्यावरून तापलं. महाविकास आघाडीच्या मागील कार्यकाळातील कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विरोधकांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, हप्ता वसुली २.० आणि कट-कमिशन संस्कृतीची पुनरावृत्ती होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
कारण, मुंबईच्या अर्थव्यवस्थेत टॅक्सी चालक, रिक्षाचालकासंह छोटे व्यावसायिक व हॉटेल चालकांचाही लक्षणीय वाटा आहे. मात्र, आता राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की, जर सत्तांतर झाले तर पुन्हा एकदा वसुली सत्र सुरू होऊ शकते. हे केवळ राजकीय आरोप नसून, सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षिततेशी आणि भविष्याशी निगडीत असणारा एक अतिशय महत्त्वाचा
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांतील टेंडर प्रक्रिया आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर नजर टाकल्यास 'कट आणि कमिशन'चे गणित स्पष्टपणे दिसून येते, असे अभ्यासकांचे मत आहे.मुद्दा आहे.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना 'सचिन वाझे' हे नाव आजही राजकीय चर्चेत अग्रस्थानी आहे. अँटालिया स्फोटक प्रकरण आणि त्यानंतर समोर आलेले वसुलीचे आरोप यामुळे तत्कालीन सरकारची मोठी नाचक्की झाली होती. जर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही लक्ष्य केले जाऊ शकते, तर मग मुंबईतील सर्वसामान्य माणसाचे काय? हा सवाल आता जनतेच्या मनात आहे.
संपूर्ण जगावर करोनाचे संकट असताना या भयानक काळातही मुंबईत भ्रष्टाचाराने डोके वर काढल्याचे दिसून आलं. कोविड काळात मृतदेहांच्या बॅगांच्या खरेदीत झालेला कथित घोटाळा आणि 'खिचडी घोटाळा' यांमुळे महाविकास आघाडीची नैतिक बाजू एकप्रकारे कमकुवत झाली आहे. संकाटच्या काळातही नफा कमावण्याची वृत्ती पाहून जनमाणसात प्रचंड नाराजीचे वातावरण दिसून आले.
वरील मुद्दे जर लक्षात घेतले तर आगामी काळात मुंबईच्या मतदारांसमोर केवळ दोन स्पष्ट पर्याय दिसत आहेत. यामध्ये एकीकडे 'विकासाचे व्हिजन' आणि दुसरीकडे 'भ्रष्टाचाराचे आरोप' आहे. जर हे नरेटिव्ह मतदारांच्या मनात उतरले, तर 'हप्ता वसुली' आणि 'कमिशन' हे मुद्दे निवडणुकीचा निकाल फिरवण्यासाठी पुरेसे ठरू शकतात. मुंबईला खरोखरच पारदर्शक कारभार हवा आहे की पुन्हा एकदा जुन्याच 'सिस्टम'चा सामना करावा लागणार, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.