Akhilesh Yadav announces Samajwadi Party will contest the Mumbai BMC elections independently, signaling a major political shift.  esakal
मुंबई

Samajwadi Party on BMC election: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांची दिल्लीत मोठी घोषणा!

Akhilesh Yadav Announcement on BMC election : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धक्का; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Samajwadi Party to Contest BMC Elections Alone: अखिलेश यादव यांचा पक्ष समाजवादी पार्टीने मुंबई महापालिकेसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंगळवारी महाराष्ट्र समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि मानखूर्द शिवाजी नगर सीटचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले आहे की, समाजवादी पार्टी स्वबळवारच १५० जागांवर मुंबई महापालिका निवडणूक लढेल.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी हे जाहीर केलं. समाजवादी पार्टीची ही घोषणा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसाठी एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. कारण, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार हे तिन्ही पक्ष राष्ट्रीय पातळीवरील विरोधकांच्या इंडिया आघाडीचाही भाग आहेत, ज्यात समाजवादी पार्टी देखील आहे. तरीही मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अखिलेश यादव यांनी असा निर्णय घेतल्याने, मविआला एकप्रकारे धक्काच बसला आहे.

याशिवाय दिल्लीत मीडियाशी बोलताना समाजवादी पार्टीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते अबू आझमी म्हणाले, की समाजवादी पार्टी स्वबळावरच बीएमसीची निवडणूक लढवेन आणि १५० जागांवर विजयी होईल. याशिवाय आझमी म्हणाले, की आमची विचाराधारा आहे की या देशात हिंदू-मुस्लिम भावाप्रमाणे राहावे. आपण जातीवाद संपवला पाहीजे. मशिदीत अजान व्हावी, मंदिरात पूजा व्हावी आणि सर्वांनी सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा... हे गीत म्हणावं. परंतु आता सत्तेत असलेल्यांना हे संपवायचे आहे.

राज ठाकेरंनी लाउडस्पीकरचा विरोध केला आणि आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि काँग्रेससोबत आहेत, या प्रश्नावर अबू आझमींनी म्हटले की, काँग्रेसचा ढोंगीपणा आहे. जेव्हा आमचा एखादा मुद्दा येतो तेव्हा हे बोलत नाहीत.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीच्या प्रश्नावर त्यांनी म्हटले की, भाजपने विचार केला पाहीजे की, एकनाथ शिंदेंनी त्यांचं सरकार आणलं होतं. एक चाल असलेलं सरकार पाडल होतं, तेव्हा शिंदे खूप चांगले होते?

याचबरोबर त्यांनी म्हटले की, मी सरकारला निवेदन करेन की शेतकरी आणि कामगारांचा सन्मान करा. तो शेतकरीच आहे जो देश चालवतो, शेतकरी जर दुखी राहिला तर देश दुखी राहील. परंतु प्रत्येक सरकार शेतकऱ्यांबाबत फक्त बोलतं, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पैशासाठी IPL विजेत्या KKR ची साथ सोडायला निघालेला भारतीय खेळाडू! धक्कादायक खुलासा

Career Horoscope 2025 : गुरुवारी वसुमान योगामुळे भगवान विष्णू करणार भरभरून कृपा ! कामकाजात होणार फायदा

Kabutarkhana: आम्ही कबुतरांना खाणं देण्यास तयार आहोत, बीएमसीचा निर्णय; पण न्यायालयाची नाराजी, कडक शब्दात सुनावलं, म्हणाले...

Thane Traffic: कल्याण शीळ रोडवर प्रचंड कोंडी, नागरिकांचे हाल; शरद पवार गट आक्रमक

ओले केस, मनमोहक अदा आणि गुलाबी साडी! पावसात अंजली अरोराचा हॉट डान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT