Mumbai Cyber Fraud eSakal
मुंबई

Cyber Fraud : गणपतीसाठी मागवत होता ऑनलाईन मिठाई, मुंबईतील व्यापाऱ्याला लाखोंचा गंडा; काय आहे प्रकरण?

Businessman Duped : या व्यापाऱ्यासोबत त्याच्या मित्रालाही फसवण्यात आलं आहे.

Sudesh

मुंबईतील व्यापाऱ्याला लाखोंचे नुकसान

मुंबईच्या अंधेरी भागातून सायबर गुन्हेगारीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. गणपतीसाठी ऑनलाईन मिठाई मागवणाऱ्या एका 72 वर्षीय व्यापाऱ्याला गंडा घालण्यात आला आहे. यूपीआयच्या माध्यमातून या व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली.

इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ओशिवाडा पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यापारी आणि त्यांची पत्नी दोघेही ओशिवारा भागात राहतात. रविवारी गणपतीला नैवेद्य म्हणून त्यांना मिठाई हवी होती. यासाठी शनिवारी त्यांनी जुहूच्या तिवारी मिठाईवालाचा नंबर सर्च केला.

यावेळी त्यांना गुगलवर एक नंबर मिळाला. याठिकाणी त्यांनी मिठाईची ऑर्डर दिली, आणि दोन वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून या नंबरवर त्यांनी 3,775 रुपये पाठवले. यानंतर त्यांना ऑर्डर प्लेस झाल्याचा मेसेज आला. मात्र, रविवारी त्यांना मिठाई मिळाली नाही.

यानंतर त्यांनी त्याच मोबाईल नंबरवर कॉल करून तक्रार केली. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की सिस्टीमने त्यांची ऑर्डर कन्फर्म केली नाही. त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा ऑर्डर प्लेस करावी लागेल. त्यांना मदत करण्याचे भासवत या व्यक्तीने दुसरा एक बँक अकाउंट नंबर दिला.

अशी झाली फसवणूक

यानंतर फोनवरील व्यक्तीने या व्यापाऱ्याला गुगल पे उघडायला सांगितलं. त्यानंतर 29,875 हा कोड सांगून तो 'गुगल पे' मध्ये टाकून, सेंड बटण दाबण्यास सांगितलं. असं केल्यानंतर पैसे ट्रान्सफर होणार नाही असंही या व्यक्तीने सांगितलं. त्यामुळे या व्यक्तीने हा 'कोड' टाकून सेंड बटण दाबले; आणि त्याच्या अकाउंटमधून पैसे डेबिट झाले.

मित्राचीही फसवणूक

यानंतर व्यापाऱ्याने याबाबत तक्रार केल्यावर, रिफंड प्रोसेस सुरू केली असल्याचं फोनवरील व्यक्तीने सांगितलं. मात्र, या व्यापाऱ्याच्याच यूपीआय अकाउंटला प्रॉब्लेम असल्याचं सांगत, एखाद्या मित्राची मदत घेण्याचा सल्ला फोनवरील व्यक्तीने दिला. त्यामुळे व्यापाऱ्याने आपल्या एका मित्राला फोन करून, या फोनवरील व्यक्तीला पैसे पाठवण्यास सांगितलं.

या व्यापाऱ्याच्या मित्राने फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला 45,000 रुपये पाठवले. मात्र, याचाही रिफंड मिळाला नाही. त्यानंतर फोनवरील व्यक्तीने व्यापाऱ्याच्या मित्राला 50 रुपये पाठवले. हे पैसे पाठवून रिफंड सिस्टीम चालू झाल्याचे सांगत पुन्हा तेवढीच रक्कम पाठवण्यास या व्यक्तीने सांगितलं.

असं फुटलं बिंग

यानंतर व्यापाऱ्याच्या मित्राला संशय आल्यामुळे त्याने जुहूमधील तिवारी मिठाईवाला यांच्या दुकानात जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना समजलं की तिवारी मिठाईवाले ऑनलाईन डिलिव्हरी देतच नाहीत. हे सांगणारी पाटी देखील या दुकानात असल्याचं त्यांनी दाखवलं. त्यामुळे या दोन मित्रांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT