Crime News  sakal
मुंबई

Mumbai Crime News : आय लव्ह यू म्हणतच केले तिच्यावर वार ; एकतर्फी प्रेमातून हत्या

Mumbai Crime News : आदित्य प्रेमाच्या आणाभाका देत आय लव्ह यु बोलत होता

शर्मिला वाळुंज

Mumbai Crime News : आईच्या समोरच तिच्या 12 वर्षाच्या निरागस मुलीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची घटना कल्याण पूर्वेत काल घडली. एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय आदित्यने तिची हत्या केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदित्य तिच्या मागे होता. परंतू त्याच्या प्रेमास तिने नकार दिला आणि ती जीवाला मुकली. चाकूने वार करताना ही आदित्य प्रेमाच्या आणाभाका देत आय लव्ह यु बोलत होता. मात्र त्याचे हे क्रूर प्रेम पाहून सर्वांचाच संताप होत होता.

कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने सारेच हळहळले आहेत. मृत बारा वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबासह या परिसरात दुर्गा सोसायटीत राहत होती. कुटुंबाची परिस्थिती तशी बेताचीच आहे.

वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय असून उल्हासनगर कॅम्प 4 येथे त्यांचे दुकान आहे. तर 20 वर्षीय भाऊ हा देखील छोटे मोठे काम करतो. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. छोटे आणि सुखी असे त्यांचे कुटुंब होते.

मात्र या कुटुंबाला आदित्यची नजर लागली असेच बोलले जात आहे. याच परिसरात राहणारा आदित्य याची काही दिवसांपासून या मुलीवर नजर होती. तो तिचा पाठलाग करत होता. तसेच त्याने यापूर्वी दोन वेळा तिला प्रेमाची मागणी देखील घातली होती. मात्र तिने स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.

बुधवारी सायंकाळी घरातील सर्वांना वडापाव खायचा असल्याने आई आणि मुलगी वडापाव आणण्यासाठी परिसरात गेल्या होत्या. वडापाव घेऊन त्या परत येत होता. यावेळी आदित्य आधीपासूनच तिच्यावर पाळत ठेवून सोसायटीच्या जिन्यावर लपून बसला होता.

मुलगी जिन्यात येताच आदित्यने तिच्यावर हल्ला केला. अनपेक्षित पणे झालेल्या या हल्ल्याने आई आणि मुलगी दोघी गांगरल्या. आईने आपल्या मुलीला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र आदित्यने त्यांना ढकलून देत मुलीवर सात ते आठ वेळा चाकूने सपासप वार केले.

तिला भोसकले एवढेच नाही तर तिच्यावर वार करताना ही तो प्रेमाच्या आणाभाका देत होता, व आय लव्ह यू म्हणत म्हणत वार करत होता. वार करून आदितीने तेथून पळ काढला यावेळी काही रहिवाशांनी त्याला पाठलाग करून पकडले दरम्यान त्याने स्वतः देखील फिनेल पिले आहे.

रहिवाशांनी मुलीला उपचारासाठी त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर आदित्य याच्यावर रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून त्याला ठाण्यातील रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. आईच्या समोरच तिच्या निरागस मुलीची हत्या झाल्याने एकतर्फी प्रेमातून आणखीन किती निरागस मुलींचे बळी जाणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.

मृत मुलीवर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख म्हणाले, आदित्य याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास सुरू आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT