File Photo 
मुंबई

मुंबई डबेवाल्यांचीही  सेवा 31 मार्चपर्यंत बंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार मुंबई डबेवाला संघटनेने आपली सेवा 20 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे दोन लाख चाकरमान्यांना आपल्या घरच्या जेवणास मुकावे लागणार आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा एप्रिल महिन्यापासून सेवा नियमितपणे सुरू करण्यात येईल, असे डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. 

सर्व नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच स्वतःची काळजी घ्यावी व सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करावे. तसेच समाज माध्यमांवर येणाऱ्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असेही आवाहन डबेवाला संघटनेकडून करण्यात आले आहे. मुंबई डबेवाल्यांच्या 130 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सलग 10 दिवस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पाच हजार डबेवाला जेवणाचे जवळपास दोन लाख डबे पोहोचवण्याचे काम करतात. 

रेल्वेच्या तीनही मार्गांवरून प्रचंड गर्दीतून हे डबेवाले जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम करतात. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केल्यानंतर मुंबई डबेवाला संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या वाढल्याने राज्य सरकारने सरकारी व खासगी कार्यालयांतील 50 टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. अनेकांनी यापूर्वी घरातून काम करण्यास सुरुवात केल्याने दररोजच्या डब्यांमध्ये सुमारे 50-40 टक्के घट झाली. दररोज प्रत्येक डबेवाल्याकडे असलेल्या 30 ते 35 डब्यांची संख्या आता 10 ते 12 डब्यांवर आली आहे. 
- सुभाष तळेकर,
अध्यक्ष, डबेवाला संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT