Court and corona 
मुंबई

कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत उच्च न्यायालयाने सरकारला दिले 'हे' निर्देश...

सुनिता महामुनकर

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत जाणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोव्हिड, केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर्स, रुग्णालयातील उपचार आदी उपाययोजना राबवल्या जात आहे. मात्र कोरोनाचा एखादा रुग्ण आढळल्यास त्याला कुठे दाखल करायचे याबाबत प्रभावी उपाययोजना असायला हवी. त्यासाठी कोव्हिड रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर मध्यवर्ती मार्गदर्शक केंद्र निर्माण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

कोव्हिड-19 च्या रुग्णांना काही रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे कथित वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने स्युमोटो जनहित याचिका दाखल केली आहे. न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये नुकतीच सुनावणी झाली. 

कोरोना संशयित रुग्णांना रुग्णालयांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी मध्यवर्ती केंद्र सुरू करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. यामुळे रुग्णालयामधील भारही वाढणार नाही आणि बाधित रुग्णांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात दाखल करण्याबाबत योग्य माहिती मिळेल. तसेच केंद्रानेच रुग्णांची आणि रुग्णालयांची लेखी माहिती नोंदवून ठेवावी, म्हणजे जर एखाद्या रुग्णालयाने रुग्णांना दाखल करून घेतले नाही, तर तेही स्पष्ट होईल. त्यामुळे अशा रूग्णालयांवर फौजदारी कारवाई करता येईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. 

औरंगाबादमधील वाढत्या रुग्ण संख्येबाबत न्यायालयाने यापूर्वीही चिंता व्यक्त केली आहे. येथील विविध प्रशासकीय यंत्रणांनाही याचिकेवर नोटीस बजावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये महापालिका आयुक्त, शासकीय रुग्णालयांच्या प्रमुखांचा समावेश आहे. सर्व यंत्रणांनी कामाच्या नोंदी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP MLA: "वर्गात 'येस सर' ऐवजी 'जय श्री राम' म्हणा..." ; भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे वाद!

Gold Rate Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! उच्चांकापासून 21 हजारांनी स्वस्त; दर आणखी कमी होणार? जाणून घ्या आजचा भाव

ज्युनिअर एनटीआरची मुख्य भूमिका असलेल्या ड्रॅगन सिनेमाची केली घोषणा; पुन्हा एकदा देशभक्तीपर सिनेमात करणार काम

Sangamner Accident: पोहण्याचा आनंद ठरला काळ; दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू, दगडाच्या खाणीत पोहायला गेले अन् परतलेच नाहीत

VIP Darshan Ban: यंदाही आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आचारसंहितेतून आषाढी कामांना वगळण्यासाठी प्रस्ताव

SCROLL FOR NEXT