mumbai local mega block  sakal
मुंबई

Mumbai Local News: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

Mumbai Mega-Block :

Chinmay Jagtap

Railway News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १८ फेब्रुवारी २०२४ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप- डाऊन जलद मार्गावर तर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अँप- डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते भाईंदर अप- डाऊन जलद मार्गावर शनिवारी- रविवारी मध्य रात्री मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे- ठाणे- कल्याण अप - डाऊन जलद मार्गावर

कधी- सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद/नीम-जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारीत थांब्यांव्यतिरिक्त

कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तर, कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकापासून पुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर रेल्वे

कुठे- सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप-डाऊन मार्गावर

कधी- सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेल/ वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे

कुठे - वसई रोड ते भाईंदर अप- डाऊन जलद मार्गावर

कधी - शनिवारी- रविवारी रात्री १२ ते मध्य रात्री ३.३० वाजेपर्यत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा बोरिवली ते विरार स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.काही लोकल गाड्या ब्लॉक दरम्यान रद्द असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT