Mumbai-Mayor-Vishwanath-Mahadeshwar 
मुंबई

आमदारकी हुकली; महापौरपदही आता महिनाभरच!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांच्यामुळे झालेल्या मतविभागणीचा फटका महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना बसला. परिणामी त्यांची आमदारकी हुकली. तसेच महिनाभरात कार्यकाळ संपणार असल्यामुळे त्यांना महापौरपदावरूनही पायउतार व्हावे लागणार आहे. 

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे झिशान सिद्दिकी यांनी महापौर महाडेश्‍वर यांचा पराभव केला. बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांच्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन झाले. झिशान यांचे पिता बाबा सिद्दिकी या मतदारसंघातून 1999, 2004 आणि 2009 असे तीनवेळा निवडून आले होते. तृप्ती सावंत यांचे पती दिवंगत बाळा सावंत याच मतदारसंघातून विजयी झाले होते. मागील वेळी निवडून आलेल्या तृप्ती सावंत यांना पुन्हा उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती. 

या भागातील मुस्लिम मते बाळा सावंत यांना मिळत होती. या वेळी ती मते सिद्दिकी आणि तृप्ती सावंत यांच्यात विभागली गेली. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आणि महाडेश्‍वर पराभूत झाले. तृप्ती सावंत यांची 'मातोश्री'ने समजूत काढली असती आणि त्यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला असता, तर ते आमदार झाले असते.

दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे महाडेश्‍वर यांच्या महापौरपदाला तीन महिने मुदतवाढ मिळाली होती. त्यांचा कार्यकाळ एका महिन्यानंतर संपेल. त्यामुळे त्यांना महापौरपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT