mumbai municipal commissioner Iqbal Singh chahal says No idea about ED summons BMC news  sakal
मुंबई

Iqbal Singh Chahal : ईडीच्या समन्सबाबत मुंबई महापालिका आयुक्त चहल यांचा मोठा खुलासा, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फतच्या समन्सवर मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रतिक्रया दिली आहे. अशा प्रकारचे कोणतेही समन्स मला मिळाल्याची कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेतील अधिकार्यांना समन्स बजावल्याची जोरदार चर्चा होती. परंतु चहल यांनी समन्सबाबत प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

चहल यांनी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावला असून सोमवार १६ जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे असे देखील बोलले जात होते.

मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कामांना वगळून इतर कामांची चौकशी करा, असे आदेश नुकतेच राज्य सरकारने कॕगला दिले होते. रस्ते तसेच इतर कामांची चौकशी करण्यासाठीचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच ईडीच्या समन्सच्या मुद्द्याने डोक वर काढले.

मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एपिडेमिक एक्टनुसारच सर्व कामे केल्याचा दावा करत त्याबाबतीत तपशील देण्याच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली होती. तसेच यंत्रणेतील अधिकार्‍यांना कॕगच्या अधिकारी वर्गाला कोविड काळातील कामांची माहिती देण्यासाठी मज्जव केला होता.

त्यामुळे कॕगच्या अधिकारी वर्गानेही या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. परंतु राज्य सरकारने कोरोना काळातील कामे वगळून चौकशीचे आदेश देण्याची भूमिका काही दिवसांपूर्वी घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khushi Mukherjee: ना ट्रोलिंगची भीती, ना पोलिसांची... प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर जोरदार राडा! पाहा व्हायरल Video

Electric Shock Death : आळेफाटा परिसरात महावितरणचा निष्काळजीपणा! बोरी खुर्द येथे डीपीमुळे विजेचा धक्का लागून ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Banking Rules Change : बँकिंगच्या नियमात १ नोव्हेंबरपासून होताय बदल; तुम्हाला माहीत आहेत का?

Kurdu Accident : भाऊबीजेच्या दिवशी काळाचा घाला! बोलाई मातेच्या दर्शनाला निघालेल्या कुर्डू येथील दोन सख्ख्या मित्रांचा अपघातात अंत

Latest Marathi News Live Update : 'मेरा बूथ सबसे मजबूत' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कामगारांशी संवाद साधला

SCROLL FOR NEXT