Mumbai Local

 
ESakal
मुंबई

Railway Accident: रेल्वे अपघातांचे सत्र सुरूच, एक दिवसात १५ मृत्यू; सुरक्षेचे गणित चुकले

Mumbai Local Train Accident: एकाच दिवसात १५ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाची ‘मिशन झीरो डेथ’ ही केवळ घोषणाच ठरली आहे, असे समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरी रेल्वे आता मृत्युवाहिनी ठरत आहे. रेल्वे मंत्रालयाने ‘मिशन झीरो डेथ’ची घोषणा करून रुळांवरील अपघात पूर्णपणे थांबवण्याचा संकल्प केला होता; मात्र वास्तव त्याच्या नेमके उलट असल्याचे मंगळवारी (ता. ९) समोर आले. तब्बल १५ प्रवाशांचा जीव रेल्वे रुळांवर गमावला गेला. एकाच दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी असल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले.

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या ११ पोलीस ठाण्यांत ही नोंद झाली आहे. एक्स्प्रेस व लोकल गाड्यांच्या धडकेत तिघे, गाडीतून पडून दोघे, तर रूळ ओलांडताना एक, पुलाखाली आजारपणामुळे एक आणि नैसर्गिकरीत्या एक, असा मृत्यूचा थरारक आकडा समोर आला आहे. याशिवाय काही प्रवासी बेशुद्धावस्थेत सापडले, तर काहींना थेट गाड्यांची धडक बसली. यापैकी काही अपघात ८ सप्टेंबरला झाले होते; मात्र चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची नोंद मंगळवारी करण्यात आली.

मृत्यूची ठिकाणे आणि कारणे

१. कुर्ला मुलुंड ते ठाणेदरम्यान- लोकलखाली सापडून मृत्यू

२. ठाणे ते कळंबोली परिसर - रूळ ओलांडताना मृत्यू

३. डोंबिवली ते भिवंडी ते खारबावदरम्यान - एक्स्प्रेसची धडक

४. कल्याण ते परिसरात - रेल्वेतून पडून मृत्यू

५. आसनगाव ते खडवली परिसर - गाडीची धडक

६. आसनगाव- आसनगाव ते आटगावदरम्यान -एक्स्प्रेसची धडक

७. कर्जत- भिवपुरी ते कर्जतदरम्यान - एक्स्प्रेसची धडक

८. लोकमान्य टिळक टर्मिनस ते चेंबूर परिसर -लोकलमधून पडून मृत्यू

९. वाशी ते खाडीपुलाजवळ -लोकलची धडक

१० बोरिवली ते परिसरात - एक्स्प्रेसची धडक

११. वसई ते नालासोपारा ते वसईदरम्यान - रेल्वे अपघात

१२. कल्याण ते अंबरनाथ परिसर- पुलाखाली आजारपणामुळे मृत्यू

१३. बोरिवली स्थानक परिसरात - बेशुद्धावस्थेत मृत्यू

१४. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला परिसर - बेशुद्धावस्थेत मृत्यू

१५. दादर ते करी रोडजवळ - नैसर्गिक मृत्यू १४. लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुर्ला परिसर - बेशुद्धावस्थेत मृत्यू

१५. दादर ते करी रोडजवळ - नैसर्गिक मृत्यू

‘मिशन झीरो डेथ’ केवळ घोषणाच

मुंबईत दररोज किमान सहा ते सात मृत्यू रेल्वे अपघातात होतात. सुरक्षिततेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून स्वतंत्र निधी खर्च होतो, तसेच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी-३ प्रकल्पांतर्गत तब्बल ५५१ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तरीदेखील अपघात कमी होण्याऐवजी वाढत असल्याने ‘मिशन झीरो डेथ’ ही केवळ घोषणाच ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

Viral Video : सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, हिंसक प्राणी असलेल्या जंगलात करावी लागली एमर्जन्सी लँडिंग

Income Tax Notice: खबरदार! मित्रांचं बिल भरण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय? तर आयकर विभाग कारवाई करणार

Uttrakhand : पंतप्रधान मोदीचा उत्तराखंड दौरा; आपत्तीग्रस्तांसाठी जाहीर केली १२०० कोटींची मदत

Asia Cup 2025: गौतम गंभीर आल्यापासून हे असंच होतंय... Arshdeep Singh वर होणाऱ्या अन्याविरोधात R Ashwin ने उठवला आवाज

SCROLL FOR NEXT