मुंबई

सचिनचा यॉर्कर आणि मुंबईकरांची फटकेबाजी; 'त्या' ट्विटनंतर मुंबईकरांच्या संयमाचा ब्लास्ट

कृष्ण जोशी

मुंबई : क्रिकेटचा सम्राट, मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत मास्टर सचिन तेंडूलकर याने शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ट्वीट केले आणि मुंबईकरांच्या संयमाचा जणुकाही ब्लास्ट झाला. लोकांनी जशा सचिनच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या, तशाच कित्येकांनी सचिनवर लाखो जोरदार बाऊन्सरचा आणि बॉडीलाईन गोलंदाजीचा वर्षाव केला. 

देशाच्या सार्वभौमत्वाबाब तडजोड होणार नाही, बाह्यशक्तींना अजिबात थारा मिळणार नाही, भारताचे निर्णय भारतीयांनीच घ्यावेत, देश म्हणून एकजुटीने राहूया, असे ट्वीट तेंडुलकरने आज केले. यापूर्वीही विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रवी शास्त्री, सुरेश रैना, अनिल कुंबळे यांनीही या विषयावर ट्वीट केली होती. पण सचिनच्या ट्वीटवर आज लोकांनी चांगलीच फटकेबाजी केली. 

सचिनच्या ट्वीटला रात्रीपर्यंत पावणेतीन लाख लोकांनी लाईक केले तर एक लाखांपेक्षा लोकांनी रीट्वीट केले आणि 55 हजारांनी त्याच्या ट्वीटवर वेगवेगळ्या स्वरुपाच्या प्रतिक्रिया नोंदविल्या. नेहमीपेक्षा सचिनच्या ट्वीटवर आज कित्येकपटीने जास्त धावांचा (प्रतिक्रियांचा) पाऊस पडला. विशेष म्हणजे यात दाक्षिणात्य, गुजराती, हिंदी, मराठी आदी सर्वभाषिक प्रतिक्रिया होत्या. काहींनी तर फाडून टाकलेल्या आयपीएलच्या तिकिटाचे फोटोही सोबत टाकले.

गेले दोन महिने थंडीत आंदोलन करणारे शेतकरी भारतीय नाहीत का, अमेरिकेत जाऊन ट्रंप चा प्रचार करणे हे देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा आणणारे नव्हते का, अशी ट्वीट करण्यात आली. तर शेतकरी आंदोलकांनी इम्रान खान ची प्रशंसा करणारी विधाने का केली, असेही सचिनच्या सहानुभुतीदारांनी दाखवून दिले. अनेकांनी शेतकरी आंदोलकांची छायाचित्रेही टाकली, तुझ्याबद्दलचा आदर नष्ट झाला, तू क्रिकेटर म्हणून महान पण माणूस म्हणून लहान आहेस, अशीही टीका करण्यात आली. 

कित्येकांनी तर याहीपेक्षा शेलक्या व तिखट शब्दांत सचिनची हजेरी घेतली व आपला राग व्यक्त केला. तू भाजप किंवा उद्योगपतींची बाजू घेत आहेस का, अशीही टोलेबाजी झाली. तर कित्येकांनी सचिनची बाजू घेऊन तो देशप्रेमी आहे, सचिनने देशभक्ती दाखवताच टुकडे टुकडे गँग मध्ये हलकल्लोळ उडाला, अशाही प्रतिक्रिया दिल्या. अनेक वॉट्सअप ग्रूपवरही ही ट्वीट आणि त्यावरील प्रतिक्रियांचे स्क्रीन शॉट टाकून जोरदार वादविवाद करण्यात आले.

mumbai news after sachin tendulkars tweet regarding farmers protest netizens starts batting

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT