mumbai police 1 
मुंबई

पुनःश्च हरिओम.. मुंबईकरांनो, दोन किलोमीटरपुढे जाऊ नका; वाचा कोणी केलंय आवाहन

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत लॉकडाऊन शिल केले असले, तरी मुंबई पोलिसांकडून अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्यातही केवळ दोन किलोमीटरच्याच परिसरातच जाण्याची मुभा देण्यात आली आहे.  

सामान्य नागरिकांच्या हालचालीवर, फिरण्यावर प्रशासनाने शिथिलता आणली असली, तर कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकानी सोशल डिस्टन्सिन्गसोबत स्वतःच्या सुरक्षेचीही काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक नागरिक या नियमांचे पालन करत नसल्यामुळे स्वतःसह इतरांचे आरोग्यही धोक्यात घालत आहेत. त्यामुळे केवळ अत्यावश्यक कामांसाठीच नागरिकांनी बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत असल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.

मुंबईत लॉकडाऊनच्या काळात कलम 188 अंतर्गत आतापर्तंयत 10 हजार 371 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्याप्रकरणी 19 हजार 635 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारपर्यत त्यातील 11 हजार 751 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यात मास्क न वापरणे, लॉकडाऊन नियम तोडणाऱ्यांचा समावेश आहे. नागरिकांनी नियम पाळून स्वतःसह इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडणेही टाळले पाहिजे, असे प्रणय अशोक यांनी आवाहन केले.

मुंबईकरांसाठी नियमावली

  • आत्यावश्यक कामांसाठीच नागरीकांनी घरातून बाहेर पडावे.
  • घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर सक्तीचा.
  • बाजार, सलून, केशकर्तनालयेमध्ये केवळ दोन किलोमीटरच्या परिसरात राहणारे नागरिकच जाऊ शकतील.
  • व्यायामासाठीही दोन किलोमीटरच्या परिसरातच जाण्याची मुभा आहे.
  • अत्यावश्यक कामासाठीही दोन किलोमिटर परिसरातच जाण्याचे आवाहन.
  • वैद्यकीय आपतकालीन स्थिती, कार्यालयात दोन किलोमीटरपुढे जाण्याची मुभा देण्यात आली आहे
  • सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे आवश्यक आहे
  • नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल.
  • नियमभंग करणारे दुकानदार, विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात येईल.
  • आत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सामान्य नागरिकांना रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी, नियम मोडल्यास कारवाई
  • वैध कारणाशिवाय स्थानिक भागांपासून दूर परिसरातील वाहने जप्त केली जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT