मुंबई

मुंबईकरांची उकाड्यातून काही अंशी सुटका, मुंबईत जोरदार पावसाची शक्यता 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- गेल्या दोन महिन्यांपासून उकाड्यानं हैराण असलेल्या मुंबईकरांना पावसानं आज दिलासा दिला आहे. पहाटे विजांच्या कडकडाटासह पावसानं आज मुंबईत हजेरी लावली. त्यामुळे सकाळी सकाळी मुंबईत पावसाचं आगमन झाल्यानं मुंबईकर चांगलाच सुखावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. त्यातून त्यांची काही अंशी सुटका झाली आहे. केरळमध्ये मान्सून 48 तास आधीच दाखल झाल्याचा दावा स्कायमेटनं केला आहे. 

अरबी समुद्रातून वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे हवामानात बदल होताना दिसताहेत. येत्या 48 तासांत महाराष्ट्रासह गुजरातमध्ये वादळीवाऱ्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मंगळवारी मुंबईत मुसळधार पाऊस

अरबी समुद्राच्या अग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून येत्या 48 तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते 3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करेल. यामुळे किनारपट्टीवर जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईमध्येही मंगळवारपासून पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईमध्ये रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारी ही आकाश ढगाळ राहील. तर मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार 3 जूनला मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही वाढलेला असेल. 3 आणि 4 जून या दिवशी मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला असून सध्या समुद्रात असलेल्या मच्छिमारांनी किनाऱ्याकडे परतावे अशा सूचनाही दिल्या आहेत. 

आज दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 2 आणि 3 जूनला कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी आणि गुरूवारी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आहे. मात्र काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची ही शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : तुर्भेतील मतदान यंत्रणेमुळे मतदार हैराण

Prakash Ambedkar Prediction: महापालिका निवडणुकीचं मतदान संपण्याआधीच प्रकाश आंबेडकरांचं निकालाबाबत मोठं भाकीत, म्हणाले..

EC Press Conference: मार्करवरून गोंधळ! शाई पुसरली जात नाही; निवडणूक आयोगाचा ठाम नकार, सांगितलं- फेक नरेटिव्ह...

Mohammed Siraj झाला कर्णधार, दोन सामन्यांमध्ये करणार संघाचे नेतृत्व; कोणत्या प्रतिस्पर्धींविरुद्ध डावपेच आखणार?

Latest Marathi News Live Update : हैदराबादमध्ये दुर्गा मंदिराची तोडफोड; भाजप नेत्यांची घटनास्थळी भेट

SCROLL FOR NEXT