File Photo 
मुंबई

एलबीएस मार्ग, दहिसर नदी घेणार मोकळा श्‍वास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिक्रमणांनी वेढलेले मुंबईतील रस्ते आणि नद्या आता मोकळा श्‍वास घेणार आहेत. विकासात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेने कठोर कारवाई सुरू केली असून, दहिसर नदी आणि पूर्व उपनगरातील महत्त्वाच्या एलबीएस रोडच्या रुंदीकरणाला आता वेग येणार आहे.

मुंबईतील नद्या अतिक्रमणांमुळे नाले झाल्या आहेत. 26 जुलै 2005 रोजी आलेल्या महापुरानंतर मिठी नदीच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर आता दहिसर नदीचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. पश्‍चिम उपनगरातील दहिसर नदीच्या किनारी झालेली 256 बांधकामे हटवण्यात आली आहेत. पूर्व उपनगरातील एलबीएस मार्ग अनेक वर्षांपासूनच्या अतिक्रमणांमुळे चिंचोळा झाला होता. या रस्त्यावरील अनेक अतिक्रमणांची प्रकरणे न्यायप्रविष्ट होती; त्यामुळे रुंदीकरण रखडले होते. 

आता मुंबईतील रस्ते आणि नद्यांलगतच्या अतिक्रमणांना प्रतिबंध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, कठोर कारवाई सुरू केली आहे. दहिसर नदीच्या किनाऱ्यावरील अतिक्रमणांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. तेथील 256 पैकी 206 बांधकामे महापालिकेच्या पथकाने हटवली. विशेष म्हणजे सुमारे 50 बांधकामे संबंधित नागरिकांनीच हटवल्याची माहिती दहिसर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली. 

पूर्व उपनगरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगतच्या अतिक्रमणांवर सलग तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 45 बांधकामे हटवण्यात आली. या दोन्ही मोहिमांत विविध प्रकारची तब्बल 301 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. विश्‍वास शंकरवार आणि देवेंद्रकुमार जैन या महापालिका उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. 

पुरापासून मिळणार दिलासा 
दहिसरच्या पूर्व व पश्‍चिम भागांतून दहिसर नदी वाहते. पावसाळ्यात नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्यास या भागांत पूरस्थिती निर्माण होऊन परिसरातील नागरिकांचे हाल होतात. या समस्येवर उपाययोजना म्हणून दहिसर नदीच्या काठावर 2065 फुटांची भिंत बांधण्याचे नियोजन आहे. त्यापैकी 1045 फुटांची भिंत बांधण्यात आली आहे. उर्वरित 1020 फुटांची भिंत बांधण्याचा मार्ग 235 बांधकामांवरील कारवाईनंतर मोकळा झाला आहे.

Municipal Corporation begins action on encroachment near Dahisar river

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये NDRF दाखल; पूर-दरड संकटासाठी बचाव पथक सज्ज

SCROLL FOR NEXT