Mumbai-Ahemdabad Bullet Train

 

ESakal

मुंबई

Mumbai Metro: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती! महाराष्ट्रातील १५७ किमींच्या ट्रॅकसाठी करार

Mumbai To Ahmedabad Metro: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रातील ट्रॅक आणि संबंधित कामांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एनएचएसआरसीएलने एल अँड टी कंपनीसोबत करार केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ट्रॅक आणि संबंधित कामांसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) कंपनीसोबत करार केला आहे. या करारामुळे मुंबईतील बुलेट ट्रेन स्थानकापासून गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत १५७ किमी लांब ट्रॅक टाकला जाणार असून, चार स्थानके आणि ठाण्यातील रोलिंग स्टॉक डेपोचाही समावेश आहे.

गुजरातमध्ये २०० किमीपेक्षा जास्त वायाडक्टवर ट्रॅक टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. हे सर्व काम भारतीय कंपन्यांकडे सोपवले गेले आहे. त्यामुळे हाय-स्पीड रेल ट्रॅक तंत्रज्ञानात भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञ अधिक पारंगत होत आहेत. या प्रकल्पात जपानच्या शिंकान्सेनप्रमाणे बॅलेस्टलेस स्लॅब ट्रॅक प्रणाली वापरली जात आहे.

या ट्रॅकसाठी मजबूत काँक्रीट बेड, विशेष मोर्टार, प्रीकास्ट स्लॅब आणि रेल फास्टनर्स अशा चार घटकांचा वापर होणार आहे. भारतीय अभियंत्यांना या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही दिले जात आहे. जपानी संस्थेच्या मदतीने गुजरातमध्ये ४३६ अभियंते प्रशिक्षित झाले असून, महाराष्ट्रात काम सुरू होण्यापूर्वी स्थानिक अभियंते आणि पर्यवेक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आतापर्यंतची प्रगती

आतापर्यंत ३२० किमी वायाडक्ट पूर्ण, ३९७ किमी पिअर बांधकाम, ४०८ किमी पिअर फाउंडेशन, १७ नदीपूल, नऊ स्टील ब्रिज, पाच काँक्रीट ब्रिज पूर्ण, २०३ किमी मार्गावर चार लाख नॉइज बॅरियर, २०२ किमी ट्रॅक बेड तयार, बीकेसी-शिळफाटादरम्यान २१ किमी बोगदा काम सुरू, पालघर जिल्ह्यात सात डोंगरी बोगद्यांची खोदकामे सुरू आहेत. गुजरातमधील सर्व स्थानके अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रातील स्थानकांचे आणि मुंबई भूमिगत स्थानकांचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: प्रतीक्षा संपली, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज, 'या' महिन्यात होणार उद्घाटन

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला

Digital Arrest: कुटुंबासह बॅंक अधिकाऱ्याला एक महिना; ‘डिजिटल अरेस्ट’, ३९ लाखांनी घातला गंडा, सायबर पोलिसांत गुन्हा

Chh. Sambhajinagar Accident: सिडकोतील जळगाव रस्ता परिसरात भरधाव कारने उडवला वृद्ध पशुवैद्यक, घटनास्थळीच मृत्यू

Pune Traffic: नवले पुलाजवळील सेवारस्ता धोकादायक; नऱ्ह्यात सांडपाणी वाहिनीवरील झाकणे गायब, अपघाताची शक्यता

SCROLL FOR NEXT